Friday, November 22, 2024
Homeराष्ट्रीयसामाजिक कार्यकर्त्या आणि पत्रकार तीस्ता सेटलवाड यांना अटक, वाचा काय आहे प्रकरण

सामाजिक कार्यकर्त्या आणि पत्रकार तीस्ता सेटलवाड यांना अटक, वाचा काय आहे प्रकरण

मुंबई : गुजरात दंगलीमध्ये मारले गेलेले काँग्रेसचे माजी खासदार एहसान जाफरी यांची पत्नी झाकिया जाफरी यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात शुक्रवारी, 24 जून रोजी सुनावणी झाली. त्यात झाकिया यांनी गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना दंगलीच्या कटाच्या आरोपातून मुक्त करणाऱ्या एसआयटीच्या क्लोजर रिपोर्टला आव्हान दिले होते. न्यायालयाने झाकियाची याचिका फेटाळून लावली.

गुजरात दंगलीप्रकरणात तीस्ता सीतलवाड यांनी न्यायालयाला चुकीची माहिती दिल्याप्रकरणी, त्यांच्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 468 अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. गुजरात एटीएसने माजी डीजीपी आरबी श्रीकुमार आणि सामाजिक कार्यकर्त्या तीस्ता सेटलवाड यांना शनिवारी मुंबईतून ताब्यात घेतले. आज पहाटे अहमदाबाद पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या ताब्यात देण्यात आले. पुढील चौकशीसाठी त्यांना अहमदाबाद येथे नेण्यात आले आहे.

न्यायालयाने आपले निरीक्षण नोंदवताना तीस्ता सीतलवाड यांनी झाकीया जाफरी यांना भावनिक करत त्यांचा फायदा घेत तत्कालीन अधिकारी आणि मंत्र्यांना यात अडकविण्याचे प्रयत्न केले. असे म्हंटले आहे. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 2002 गुजरात दंगलप्रकरणी खोटी आणि चुकीची माहीती दिली असे सांगितले त्यानंतर सीतलवाड यांना अटक करण्यात आली.

कोण आहे तीस्ता सेटलवाड ?
तीस्ता यांचा जन्म 1962 मध्ये महाराष्ट्रात झाला. वडील अतुल सेटलवाड वकील होते. तीस्ताने मुंबई विद्यापीठातूनच शिक्षण घेतले. तिस्ताने कायद्याचे शिक्षण मधेच सोडून पत्रकारिता केली. पत्रकार म्हणून अनेक वृत्तपत्रांत काम केले आहे. 2002 च्या गुजरात दंगलीनंतर तीस्ता अधिक सक्रिय झाली. दंगलग्रस्तांसाठी सिटीझन्स फॉर जस्टिस अँड पीस नावाची एनजीओ सुरू केली. हीच संघटना 2002 च्या गुजरात दंगलीतील कथित सहभागाबद्दल नरेंद्र मोदींसह इतर अनेक राजकारणी आणि सरकारी अधिकाऱ्यांवर फौजदारी खटला चालवण्याची मागणी केली होती. तीस्ता सेटलवाड यांना 2007 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 2002 मध्ये त्यांना राजीव गांधी राष्ट्रीय सद्भावना पुरस्कारही मिळाला आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय