Friday, November 22, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडनाशिकमध्ये रंगले 'स्मार्ट खड्डे काव्य संमेलन'

नाशिकमध्ये रंगले ‘स्मार्ट खड्डे काव्य संमेलन’

नाशिक : भारतीय कम्युनिस्ट पक्ष, नाशिक शहराच्या वतीने दिनांक २१ ऑगस्ट रोजी स्मार्ट खड्डे काव्य संमेलन रंगले. नाशिक शहरात रोज खड्ड्यांशी लढणा-या, वाऱवार अपघातांचा सामना करणा-या, अनेकदा हाॅस्पिटलची वारी करणा-या तमाम नाशिककरांना प्रथमच शहरातील नमांकीत कवी स्मार्ट खड्ड्यांच्या काव्याची मेजवानी दिली.

सदर काव्यसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी प्रसिध्द कवी, लेखक डाॅ.शंकर बो-हाडे असतील. तर शहरातील अनेक नामांकीत कवी काव्य मैफलीत रंग भरले.

नाशिक शहर स्मार्ट करण्याचा महापालिका प्रशासनाचा व लोकप्रतिनिधींचा संकल्प नाशिक शहरातील रस्त्यांवरुन पुर्णत्वास आल्याचे दिसते. म्हणून नाशिक महापालिकेतील आयुक्त,बांधकाम विभागाचे अधिकारी, शहरात कमी पैशात, चकचकीत व स्मार्ट रस्ते तयार करणारे बुध्दीमान ठेकेदार, तसेच कोणत्याही फळाची अपेक्षा न करता ठेकेदारांच्या पाठीशी उभे राहणारे नगरसेवक यांच्या जाहीर अभिनंदनाचा ठराव या कवी संमेलनात झाला; तसेच शहरातील नागरिकांची काळजी वाहणा-या वरील मंडळीना राष्ट्रपती पुरस्कार देण्यात अशी राष्ट्रपतींकडे शहरातील नागरीकांच्या वतीने मागणी करण्यात आली.

या संमेलनात शहरातील खड्ड्यांनी लढताना शहीद झालेल्या नागरीकांचे प्रमुख चौकात स्मारक उभे करण्याची मागणी आयुक्तांकडे व शासनाकडे ठरावाद्वारे करण्यात येणार आहे. ज्याचा आदर्श पुढील पिढ्या घेतील व खड्ड्यांनी लढण्याची मनाची तयारी करतील.

या काव्यसंमेलनातून‌ नाशिक शहरातील स्मार्ट खड्ड्यांबाबत अनोखा संदेश देण्याचा प्रयत्न झाला. खड्डे अपघातात मृत्यु झालेल्या सर्वाना आदरांजली अर्पण करण्यात आली. नाशिककर कवी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिवमंडळ सदस्य राजू देसले,‌ नाशिक सचिव महादेव खुडे, पद्माकर इंगळे, रामदास सोंग, तेव्हा शेख, विराज देवांग, कैलास मोरे आदींसह उपस्थित होते.

Lic
संबंधित लेख

लोकप्रिय