Thursday, November 21, 2024
Homeपर्यटनSikkim tour : भारताची सौंदर्यभूमी सिक्कीम

Sikkim tour : भारताची सौंदर्यभूमी सिक्कीम

आकाराने गोव्याखालोखाल दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात लहान राज्य असलेले सिक्कीम येथील निसर्ग सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. कांचनगंगा हे जगातील तिसरे सर्वात उंच पर्वतशिखर सिक्कीम व नेपाळच्या सीमेवर आहे. सिक्कीममधील बहुसंख्य जनता नेपाळी वंशाची असून बौद्ध हा येथील प्रमुख धर्म आहे. (Sikkim tour)

सिक्कीममध्ये सतराव्या शतकापर्यंत नामग्याल राजघराण्याची एकसत्ताक पद्धत रूढ होती. राजा तेन सिंग न्यामग्याल ने युकसोम येथून राजधानी हलवून रबदानसे येथे नेली. पण नेपाळ व भूतान यांच्याकडून सतत होणाऱ्या स्वाऱ्यांनी या छोट्या राज्याची व रहिवाश्यांची वाताहत झाली. ब्रिटिश काळात सिक्कीमचे तत्कालीन हिंदुस्थानच्या मदतीने नेपाळशी युद्ध झाले. त्या वेळी सिक्कीमने ब्रिटिश इंडिया व नेपाळशी अनुक्रमे सुगोली, तितालिया करार करून हस्तगत केलेला भाग परत मिळवला. भारताचा स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १९८४ पर्यंत सिक्कीम भारताचे संरक्षित क्षेत्र बनले.


सिक्कीमच्या संरक्षण, परराष्ट्र आणि दळणवळणाची जबाबदारी सरकारने स्वीकारली. भारताबरोबर घनिष्ठ संबंध असावेत अशी इच्छा सिक्कीमने १९८४ मध्ये व्यक्त केली. त्यानुसार सिक्कीमला सहयोगी राज्य घोषित करण्यात आले. यामुळेही सिक्कीमच्या आकांक्षा पूर्ण झाल्या नाहीत.

म्हणून १९७५ मध्ये पंतप्रधान इंदिरा गांधींच्या राजवटीत सार्वमत घेऊन सिक्कीम भारतीय संघराज्यात सामील झाले व ते भारताचे एक राज्य म्हणून गणले जाऊ लागले. सिक्कीम हे तीन दिशांनी वेगवेगळ्या सीमांनी बंदिस्त असल्याने संरक्षणदृष्ट्या अतिसंवेदनशील आहे, त्यामुळे भारतीय लष्कराचे तेथे वर्चस्व आहे. (Sikkim tour)

राजधानी गंगटोक येथे बागडोगराहून कारने किंवा हेलिकॉप्टरने जाता येते, पण हेलिकॉप्टरची सेवा दिवसातून एकदाच असते. शिवाय एका वेळेला फक्त चारच माणसे जाऊ शकतात. त्यामुळे प्रायव्हेट टॅक्सीज, बसेस यांची भरपूर वर्दळ असते. कोलकाता येथून सिलिगुडी किंवा जलपायगुडीपर्यंत रेल्वेने जाता येते.

पुढे बस किंवा टॅक्सीने सिक्कीमला पोहोचता येते. मोठ्या अवजड वाहनांना, आणि दुसऱ्या राज्यातील टूरिस्ट वाहनांना सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत गंगटोकमधे अजिबात प्रवेश नसतो. (Sikkim tour)

सिक्कीमच्या पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण भागातली अनुक्रमे गंगटोक, ग्यालशिंग, मंगन, नामची ही प्रमुख शहरे आहेत. गंगटोक ही राजधानी असल्याने ते शहर प्रमुख कचेऱ्या, शाळा, कॉलेजेस, इत्यादींमुळे जास्त वहिवाटीचे व दाटीवाटीचे आहे. डोंगराळ भागामुळे रस्ते खूपच अरुंद आणि चढ-उताराचे, त्यामुळे वाहतूकीचे नियम अगदी कडक आहेत, ते कसोशीने पाळले जातात.

सिक्कीम, ज्यांना अनेकदा ‘गूढ वैभवाची भूमी’ म्हणून संबोधले जाते त्यांच्यासाठी प्रवास आणि पर्यटनाच्या अनुषंगाने ‘सिक्कीम माहिती’ शोधणार्‍यांसाठी, येथे पाहुण्यांचे मन मोहून टाकणारी प्रमुख आकर्षणे आहेत.

त्सोमगो (चांगु) तलाव

12,400 फूट उंचीवर असलेले हे हिमनदीचे सरोवर बर्फाच्या पर्वतांनी वेढलेले आहे. हे एक अतिवास्तव लँडस्केप देते, विशेषतः हिवाळ्यात.

नथुला पास – प्राचीन रेशीम मार्गाचा एक महत्त्वाचा भाग, ही खिंड भारताला तिबेटशी जोडते. निसर्गप्रेमी आणि इतिहासप्रेमींसाठी ही एक मेजवानी आहे.

युमथांग व्हॅली

‘व्हॅली ऑफ फ्लॉवर्स’ हे निसर्गप्रेमींसाठी एक नंदनवन आहे, विशेषत: वसंत ऋतूमध्ये जेव्हा रानफुलांनी खोऱ्याला आच्छादित केले असते.

गुरुडोंगमार तलाव

जगातील सर्वात उंच गोड्या पाण्याच्या तलावांपैकी एक, बर्फाच्छादित शिखरांच्या पार्श्‍वभूमीवर त्याचे निळे निळे पाणी हे पाहण्यासारखे आहे.

नामची समद्रुपसे

गुरु पद्मसंभवांच्या भव्य पुतळ्याचे घर, हे चित्तथरारक दृश्यांसह तीर्थक्षेत्र आहे.
चार धाम: भारतातील चार पवित्र धामांच्या प्रतिकृती असलेले तीर्थक्षेत्र आणि सांस्कृतिक संकुल. लाचुंग आणि लाचेन, झुलुक, गुहा, गरम पाण्याचे झरे आणि धबधबे. या राज्याच्या प्रत्येक कोपऱ्यात एक अनोखी ‘सिक्कीम इन्फॉर्मेशन’ कॅप्सूल उपलब्ध आहे, ज्यामुळे पर्यटकांना आठवणी आयुष्यभर जपल्या जातील.

सिक्कीम हे भारतातील पहिले संपूर्ण सेंद्रिय शेती करणारे राज्य ठरले आहे. येथे सुमारे ७५ हजार हेक्‍टर शेतजमिनीत सेंद्रीय शेती सुरू करण्यात आली आहे.

सिक्कीम मध्ये तुम्ही अवश्य पर्यटन करा, अतिशय आल्हाददायक हवा, रमणीय निसर्ग,आणि शिस्तबद्ध ट्रॅफिक यामुळे आपण इथे युरोपमध्ये आलो आहोत असे वाटते.

संबंधित लेख

लोकप्रिय