मनुस्मृती दहन करून बाबासाहेबांनी जातीच्या उतरंडीला हादरा दिला – डॉ.किशोर खिल्लारे
पुणे / क्रांतिकुमार कडुलकर : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी २५ डिसेंबर १९२७ रोजी मनुस्मृतीचे जाहीर दहन केले व मनूच्या जाती व्यवस्थेला तडा देवुन इतिहासाचे कालचक्र फिरवले त्या निमित्ताने तसेच विद्यार्थी व युवक चळवळीत नेहमीच अग्रेसर राहिलेले व जन आरोग्य मंचचे संस्थापक सचिव कालकथीत डॉ शेखर बेंद्रे ह्यांच्या स्मृति दिनानिमित्त
जन आरोग्य मंच व जाती अंत संघर्ष समितीच्या वतीने शहीद भगतसिंग सभागृह,नारायण पेठ येथे अर्थतज्ञ तथा सामाजिक कार्यकर्ते प्रा.अजित अभ्यंकर ह्यांचे ‘ बाबासाहेबांनी मनुस्मृती का जाळली?’ ह्या विषयावर व्याख्यान व चर्चासत्र आयोजित करण्यात आले.
ते म्हणाले की बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली ही क्रांतिकारक घटना आहे. मनुस्मृतीमध्ये सर्व जातीतील स्त्रियांना व शूद्रांना अतिशय हीन BC वागणूक दिलेली आहे व धर्माच्या नावाने गंभीर शिक्षा सांगितली आहे. त्यामुळे हजारो वर्ष शूद्र आणि स्त्रियां गुलाम राहिले होते. मनुस्मृती दहनाच्या दिवशी तत्कालीन अस्पृश्य समाज मोठ्या प्रमाणात बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली सहभागी झाला होता व त्यांना इतर जातीतील काही लोकांनीही जातीयवादी हिंदूच्या विरोधात पाठिंबा दिला होता.’
ह्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. किशोर खिल्लारे होते. अध्यक्षीय समारोप करतांना त्यांनी सागितले की “बाबासाहेबांनी मनुस्मृतीचे दहन करून जातीच्या उतरंडीला हादरा दिला व गुलामगिरीतून स्त्रियांना व शूद्रांना मुक्त करण्यासाठी हजारों वर्षाचे इतिहासाचे कालचक्र फिरवले. गेल्या काही वर्षात मनुवाद पुन्हा उफाळून येत आहे तेव्हा ‘मनुवाद हटवू या व संविधान वाचवू या ‘ असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या सुरवातीस प्रास्ताविक डॉ. अविनाश सराटे प्रास्ताविक केले. डॉ महारुद्र डाके ह्यांनी डॉ. शेखर बेंद्रेच्या आठवणी सांगून त्यांचे प्रेरणादायी कार्य व चळवळीतील योगदान सांगितले. प्रा.अजित अभ्यंकर ह्यांचे स्वागत डॉ. सुधीर दहिटनकर ह्यांनी केले.
आभार प्रदर्शन डॉ.वर्षा जावळे ह्यांनी केले. कार्यक्रमास वसंत पवार, डॉ. वैशाली पटेकर, विशाल पेकारी, सचिन देसाई, डॉ. बाळासाहेब जाधव, डॉ. ज्ञानेश्वर मोटे, अंजली दहिटनकर व एस एफ आय चे अनेक विद्यार्थी उपस्थित होते व त्यांनी चर्चासत्रात सहभाग घेतला.