Monday, May 20, 2024
Homeआंतरराष्ट्रीयShriram mandir:व्हिडीओ न्यूज:अमेरिकेच्या टाइम स्क्वेअर मध्ये श्रीरामाचा जयघोष

Shriram mandir:व्हिडीओ न्यूज:अमेरिकेच्या टाइम स्क्वेअर मध्ये श्रीरामाचा जयघोष

न्यूयॉर्क:दि.२२-श्रीराम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहोळा अयोध्येत मोठ्या जल्लोषात सुरू आहे.
तर परदेशातही भारतीय उत्साहाने राम भक्तीत रमले आहेत.
भव्य राम मंदिरात भगवान श्रीराम विराजमान झाल्याचा ऐतिहासिक क्षण पाहायला अमेरिकेत लोक उत्सुक झाले आहेत.
अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातील प्रसिद्ध टाईम स्क्वेअरवरही रामजन्मभूमी प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम दाखवण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राम मंदिर उद्घाटनाचा कार्यक्रम अमेरिकेतील प्रत्येक शहरात प्रसारित केला जात आहे.

राम मंदिराच्या उद्घाटनापूर्वी अमेरिकेतील प्रसिद्ध टाईम्स स्क्वेअरवर ढोल-ताशांच्या आवाजासह ‘जय श्री राम’च्या घोषणा देण्यात आल्या. अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यासाठी न्यूयॉर्क टाइम्स स्क्वेअरवर मोठी गर्दी जमली आहे. या उत्सवात शेकडो हिंदू सहभागी झाले होते.
न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तानुसार मॅनहॅटन, न्यूयॉर्कमध्ये विविध ठिकाणी मोठे स्क्रीन लावण्यात आले आहेत. राम मंदिर उद्घाटनाचे थेट प्रक्षेपणही येथे दाखवले जात आहे.


केवळ अमेरिकाच नाही तर नेपाळ, कॅनडा यासह जगातील इतर देशांतही राममंदिर कार्यक्रमाचे टेलिकास्ट दाखवले जात आहे, जिथे भारतीयांची संख्या जास्त आहे.त्या टेक्सास, यूएसए येथील ‘श्री सीता राम फाऊंडेशन’चे कपिल शर्मा म्हणाले की, अयोध्या धाममध्ये 500 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर प्रभू रामाच्या मंदिराची उभारणी हा जगभरातील हिंदूंसाठी श्रद्धेचा आणि उत्सवाचा महत्त्वाचा दिवस आहे. श्री सीता राम फाऊंडेशनने याचे आयोजन केले आहे. ह्यूस्टन येथील मंदिरात श्री रामजन्मभूमी प्राणप्रतिष्ठा सोहळा सुंदरकांडने सुरू होत असून त्यानंतर नृत्य, गायन आणि संगीताचे सांस्कृतिक कार्यक्रम होणार असल्याचे त्यांनी सांगितले.


राम मंदिराच्या उत्सवाचे महत्त्व लक्षात घेऊन मॉरिशस सरकारने सार्वजनिक सेवेत काम करणाऱ्या हिंदू अधिकाऱ्यांसाठी २२ जानेवारीला दोन तासांची विशेष सुट्टी जाहीर केली आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय