पुणे : – रयत शिक्षण संस्थेचे श्री मुक्तादेवी माध्यमिक विदयालय नारोडी (ता.आंबेगाव) येथील वस्तीगृहात राहत असलेले मुळ नायफड येथील कु. प्रज्ञा लक्ष्मण ठोकळ 92.60 टक्के मिळवून प्रथम क्रमांक आला, मुळगाव नानवडे येथील फणसवाडीची कु. सुनिता सखाराम भवारी 88.80 टक्के मिळवून द्वितीय क्रमांक मिळवला. कु. श्रावणी अरुण पोखरकर 88.40 टक्के मिळवून तृतीय क्रमांक मिळवला.
मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांन्त प्रमाणपत्र दहावीचा शाळेचा निकाल 100% लागला. परीक्षेस प्रविष्ट विद्यार्थी 54 बसलेले डिस्टिक्शन विद्यार्थी 13, प्रथम श्रेणीत विद्यार्थी – 25, द्वितीय श्रेणीत विद्यार्थी 14 पास झाले आहेत.
सर्व यशस्वी विद्यार्थिनी, शिक्षक यांचे शालेय प्रशासन, स्थानिक स्कूल कमिटी सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, शिक्षक पालक संघ सदस्य आंबेगाव, सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्य ग्रामपंचायत नारोडी, माजी विद्यार्थी, ग्रामस्थ नारोडी मुख्याध्यपक एन. एन. डोके, माजी मुख्याध्यापक एस. व्ही. शिंदे यांचेकडून अभिनंदन केले.
यावर्षी गेस्ट लेक्चर मार्गदर्शन जुन्नर तालुका गणित अध्यापक संघाचे अध्यक्ष ताजणे सर व रा. प. सबनीस विद्यालय नारायणगाव येथील विज्ञान अध्यापक बाबेल सर यांनी मार्गदर्शन केले. संवेदना मानव जागृती सामाजिक संस्था मुंबई यांनी सराव परिक्षेचे आयोजन केले होते या सर्वांच्या मदतीनेच शाळेचा 100 टक्के निकाल लागला आहे, असे मुख्याध्यपक एन. एन. डोके यांनी सांगितले.