Monday, May 13, 2024
Homeराज्यधक्कादायक : पुण्यात चेंबरमध्ये काम करताना दोन कामगारांचा गुदमरून मृत्यू, एक बेपत्ता

धक्कादायक : पुण्यात चेंबरमध्ये काम करताना दोन कामगारांचा गुदमरून मृत्यू, एक बेपत्ता

पुणे : पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. पुण्यात सोसायटीच्या चेंबरमध्ये गुदमरून दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या बातमीमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

वाघोलीजवळील मोझे कॉलेज रस्त्याजवळील एका सोसायटीच्या चेंबरमधे 3 कर्मचारी काम करताना अडकले. ही घटना कळताच पीएमआरडीए वाघोली अग्निशमन केंद्राचे जवान घटनास्थळी पोहचले. पीएमआरडीए अग्निशमन जवानांनी दोघांना बाहेर काढले तर एकजण बेपत्ता असून त्याचा शोध सुरू आहे. यातील दोघांचा मृत्यू झाला आहे.

चेंबरमध्ये काम करणाऱ्या नितीन प्रभाकर गोड (वय ४५ वर्षे), गणेश भालेराव (वय २८ वर्षे), सतीशकुमार चौधरी (वय ३५ वर्षे) राहणार वाघोली अशी तिघांची नावे आहे. ते चेंबर दुरुस्त करण्यासाठी सकाळी कर्मचारी आले होते. पुणे महागर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून ही माहिती देण्यात आली आहे. घटनास्थळी लोणीकंद पोलिसांचे पथकही दाखल झाले आहे.

Lic
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय