Shivsena UBT Candidate : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांकडून उमेदवारांच्या यादीची घोषणा करण्यात येत आहे. यामध्ये भाजप, शिवसेना शिंदे गट, अजित पवार गट आणि मनसेकडून आधीच उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. आता, शिवसेना उद्धव ठाकरे गटानेही त्यांच्या उमेदवारांना एबी फॉर्म वाटप करण्यास सुरुवात केली आहे.
ठाकरे गटाने त्यांच्या पहिल्या उमेदवाराची घोषणा माहीम मतदारसंघातून केली आहे, जिथे अमित ठाकरे यांच्या विरोधात महेश सावंत यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे आता शिवसेना ठाकरे गटाकडून अनेक दिग्गज नेत्यांना उमेदवारी मिळणार असल्याचं दिसून येत आहे.त्यामुळे माहीममधील निवडणुकीत उत्सुकता वाढली आहे, कारण मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या गटाचे महेश सावंत एकमेकांना टक्कर देणार आहेत.
शिवसेना उद्धव ठाकरे गटाने एकूण 8 दिग्गज नेत्यांना एबी फॉर्म दिले आहेत. याशिवाय नाशिक जिल्ह्यातील नाशिक मध्य, नाशिक पश्चिम आणि मालेगाव बाह्य या विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांना मातोश्रीवर एबी फॉर्म देखील देण्यात आले आहेत. हे 8 उमेदवार आगामी विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे प्रतिनिधित्व करतील.
Shivsena UBT Candidate l शिवसेना ठाकरे गटाकडून या नेत्यांनी एबी फॉर्म घेतले :
- सुधाकर बडगुजर(नाशिक पश्चिम)
- वसंत गिते(नाशिक मध्य)
- अद्वय हिरे (मालेगाव बाह्य)
- एकनाथ पवार (लोहा कंधार)
- के पी पाटील, राधानगरी विधानसभा
- बाळा माने, रत्नागिरी विधानसभा
- अनुराधा नागवडे, श्रीगोंदा विधानसभा
- गणेश धात्रक, नांदगाव
शिवसेना उद्धव ठाकरे गटाने विधानसभा निवडणुकीसाठी आपले पहिले 8 उमेदवार जाहीर केले आहेत. हे 8 उमेदवार आगामी विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे प्रतिनिधित्व करतील.
Shivsena UBT Candidate
हेही वाचा :
इंदापूरमध्ये राष्ट्रवादीचे दोन गट आमने-सामने?
अजित पवार गटाची यादी जाहीर, वाचा कुणा कुणाला मिळाली संधी
दाना चक्रीवादळ आज धडकण्याची शक्यता, महाराष्ट्रावर होणार का परिणाम?
मनसेची दुसरी उमेदवारी यादी जाहीर; राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात
शिवसेना शिंदे गटाची पहिली यादी जाहीर; मुख्यमंत्री शिंदेंसह अनेक उमेदवारांची नावे घोषित
लॉरेन्स बिश्नोई महाराष्ट्रातून विधानसभा निवडणूक लढवणार? ‘या’ पक्षाकडून मिळाली ऑफर
सूरज चव्हाणचा पहिलाच सिनेमा वादाच्या भोवऱ्यात, कोर्टात जाण्याची शक्यता!
विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, दहावीच्या परीक्षेत मोठा बदल
पुण्यात बड्या नेत्याच्या कारमधून 5 कोटींचं घबाड जप्त
पुण्यातील महात्मा फुले मंडई परिसरातील मेट्रो स्थानकाला भीषण आग
भाजपची पहिली उमेदवार यादी जाहीर – 99 जागांसाठी उमेदवारांची नावे घोषित
देशभरात ‘इमर्जन्सी’ लागणार, महत्वाची माहिती समोर
हिंदुस्थान उर्वरक आणि रसायन लिमिटेड अंतर्गत भरती
ONGC Bharti : तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात विविध जागांसाठी भरती