Friday, May 3, 2024
Homeताज्या बातम्याShirur loksabha: दिल्लीचे तख्त पलटवु शकतो, ही महाराष्ट्राची ताकद आहे - डॉ....

Shirur loksabha: दिल्लीचे तख्त पलटवु शकतो, ही महाराष्ट्राची ताकद आहे – डॉ. अमोल कोल्हे

Shirur loksabha: सध्याच्या परिस्थितीत विचारांचा वारसदार असणं फार महत्वाच आहे. देशाच्या निवडणुकीत महाराष्ट्राची जबाबदारी फार मोठी आहे. देशाने निर्णय घेतलाय. देशातलं वातावरण बदलत आहे. त्यामुळेच दिल्लीचे ही तख्त पलटवण्याची ताकद महाराष्ट्राच्या मनगटात आहे, असे प्रतिपादन खासदार डॉ. अमोल कोल्हे (amol kolhe) यांनी केलं. (Shirur loksabha News)

महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे आज खेड विधानसभेच्या दौऱ्यावर आहेत. त्यावेळी ग्रामस्थांसोबत डॉ. कोल्हे यांनी संवाद साधला. यावेळी अशोक खंडेभराड, अतुल देशमुख, बाबाजी काळे, सुधीर मुंगसे, हिरामण सातकर, संजय घनवट, शिवाजी वर्पे, विशाल झरेकर, राजमाला बुट्टे, श्रद्धा सांडभोर, मनीषा सांडभोर, नीलिमा राक्षे, उषा बोराडे, अलका जोगदंड त्यांच्या समवेत सहभागी होते.

डॉ. कोल्हे म्हणाले की, अमरावतीचे भाजपचे उमेदवारच सांगत आहेत की, पंतप्रधान मोदींची लाट आता राहिलेली नाही. हेच चित्र सगळ्या देशात आहे. दक्षिण भारत असो की ईशान्य भारतासह अनेक राज्यात भाजप नाही.

या परिस्थितीत महाराष्ट्रातल्या माणसांची जबाबदारी मोठी आहे. आतापर्यंत आपण म्हणत होतो दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा, आता मात्र, दिल्लीचे ही तख्त पलटवू शकतो महाराष्ट्र माझा, ही महाराष्ट्राच्या मनगटातली ताकद दाखवून द्यायची आहे, अस आवाहन ही डॉ. कोल्हे (amol kolhe) यांनी केलं.

कोणाची शेवटची निवडणूक आहे म्हणून आपले प्रश्न सुटणार नाहीत

देश पातळीवरची निवडणूक असली तरी विरोधकांकडे प्रचाराचे मुद्दे नाहीत. म्हणून ते वैयक्तिक पातळीवर येऊन टीका करत आहेत. विरोधी उमेदवार सुरवातीला म्हणाले, २०१९ चा बदला घेण्यासाठी निवडणूक लढवायची, आता वारं बदललं हे लक्षात आल्यावर म्हणतात माझी शेवटची निवडणूक आहे. पण कोणाची पहिली निवडणूक असो किंवा शेवटची. त्याने आपले प्रश्न सुटणार नाहीत. महागाई कमी होणार नाही, की हाताला काम मिळणार नाही. याचाही विचार मतदारांनी करावा, असेही डॉ. कोल्हे म्हणाले.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

मोठी बातमी : पार्थ पवार यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय, वाचा काय आहे कारण !

मोठी बातमी : MDH आणि Everest च्या काही मसाल्यांवर बंदी

खासदार श्रीरंग बारणे यांचा अर्ज दाखल

राज्यातील 11 मतदारसंघात २५८ उमेदवार रिंगणात

ब्रेकिंग : मतदान यादीत नाव नोंदविण्याची आज शेवटची तारिख, असा करा अर्ज !

७५ टक्क्‍यापेक्षा जास्‍त मतदान टक्केवारी साध्‍य करणाऱ्या केंद्राचा होणार सन्‍मान

प्रकाश आंबेडकरांचा खळबळजणक दावा, दोन महिन्यानंतर एकनाथ शिंदे…

ब्रेकिंग : शाळांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या जाहीर, वाचा किती दिवस असणार सुट्ट्या !

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय