Shirur : मुखई (ता. शिरूर) येथे दुचाकीत साडीचा पदर अडकून पडल्याचे महिलेचा मृत्यू झाला. रेणुका बाबुराव वोइंदे (वय २८, रा. धामारी, ता. शिरुर), असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. धामारी येथील पाबळ शिक्रापूर रस्त्याने बाबुराव वोइंदे व रेणुका वोइंदे हे दोघे त्यांच्या दुचाकीहून चाललेले होते. (Shirur)
मुखई गावातील मुक्ताई मंदिराजवळ आल्यानंतर रेणुका यांच्या साडीचा पदर दुचाकीच्या चाकात अडकून गुंढाळला गेल्याने रेणुका या रस्त्यावर पडल्या. त्यांच्या डोक्याला मार लागला. यावेळी त्यांना उपचारासाठी शिक्रापूर येथील खासगी रुग्णालयात आणले.
डॉक्टरांनी त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित केले. हनुमान पवार यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
हेही वाचा :
ब्रेकिंग : गॅस सिलिंडर स्वस्त ; महिन्याच्या पहिल्याच दिवशी सामान्यांना दिलासा
ब्रेकिंग : महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षेचे सुधारित वेळापत्रक जाहीर
नवीन लोकसभा स्थापित झाल्याची अधिसूचना आयोगाकडून प्रसिद्ध होईपर्यंत आचारसंहिता कायम
भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाचे आयोजन
एसटी महामंडळात विविध पदांसाठी मोठी भरती
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात इंटर्नशिपची संधी
संतापजनक : मनुस्मृतीचे दहन करायला गेले बाबासाहेब आंबेडकरांचे छायाचित्र फाडले
धक्कादायक : कुऱ्हाडीने आई-वडील, पत्नीसह ८ जणांची हत्या करून आत्महत्या
पुणे अपघात प्रकरण : बिर्याणीचा आस्वाद घेत समितीकडून चौकशी, संताप व्यक्त
अन् राहुल गांधी यांनी अचानक ओतले डोक्यावर पाणी, व्हिडिओ व्हायरल