Sunday, December 8, 2024
Homeताज्या बातम्याGas Cylinder : गॅस सिलिंडर स्वस्त ; महिन्याच्या पहिल्याच दिवशी सामान्यांना दिलासा

Gas Cylinder : गॅस सिलिंडर स्वस्त ; महिन्याच्या पहिल्याच दिवशी सामान्यांना दिलासा

Gas Cylinder : जूनच्या पहिल्याच दिवशी एक आनंदाची बातमी आली आहे. आजपासून व्यावसायिक LPG सिलेंडरच्या किंमतीत घट झाली आहे. तेल विपणन कंपन्यांनी 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमती कमी केल्या आहेत. व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किंमती 72 रुपयांनी कमी झाल्या आहेत. हा सलग तिसरा महिना आहे जेव्हा व्यावसायिक एलपीजी सिलेंडरचे (Gas Cylinder) दर कमी करण्यात आले आहेत.

तेल कंपन्यांनी 14.2 किलोच्या घरगुती सिलेंडरच्या किंमती कायम ठेवल्या आहेत आणि त्याच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. IOCL वेबसाइटनुसार, नवीन दर आज 1 जून 2024 पासून लागू करण्यात येणार असून दिल्लीत व्यावसायिक सिलेंडरची किंमत 1676 रुपयांना उपलब्ध होणार आहे. जी पूर्वी 1745 रुपये होती. (Gas Cylinder)

तसेच, कोलकत्तामध्ये सिलेंडरचे दर ७२ रुपयांनी कमी झाले आहेत. आता येथे सिलेंडर १७८७ रुपयांना मिळणार आहे. मुंबईत सिलिंडर 69.50 रुपयांनी कमी होऊन 1629 रुपयांना मिळणार आहे. चेन्नईमध्ये सिलेंडरची किंमत 1840.50 रुपये झाली आहे. चंदीगडमध्ये 19 किलोचा व्यावसायिक सिलेंडर 1697 रुपयांना मिळणार आहे. पाटण्यात त्याचा नवा दर 1932 रुपये झाला आहे. भोपाळ, मध्य प्रदेशमध्ये, 19 किलोचा व्यावसायिक एलपीजी सिलिंडर 1704 रुपयांना आणि लखनऊ, उत्तर प्रदेशमध्ये 2050 रुपयांना उपलब्ध होईल.

Gas Cylinder

दरम्यान, तेल कंपन्यांच्या या निर्णयामुळे रेस्टॉरंट आणि हॉटेल्स सारख्या व्यावसायिक वापरकर्त्यांना थोडा दिलासा मिळणार आहे.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

ब्रेकिंग : महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षेचे सुधारित वेळापत्रक जाहीर

नवीन लोकसभा स्थापित झाल्याची अधिसूचना आयोगाकडून प्रसिद्ध होईपर्यंत आचारसंहिता कायम

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाचे आयोजन

एसटी महामंडळात विविध पदांसाठी मोठी भरती

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात इंटर्नशिपची संधी

संतापजनक : मनुस्मृतीचे दहन करायला गेले बाबासाहेब आंबेडकरांचे छायाचित्र फाडले

धक्कादायक : कुऱ्हाडीने आई-वडील, पत्नीसह ८ जणांची हत्या करून आत्महत्या

पुणे अपघात प्रकरण : बिर्याणीचा आस्वाद घेत समितीकडून चौकशी, संताप व्यक्त

अन् राहुल गांधी यांनी अचानक ओतले डोक्यावर पाणी, व्हिडिओ व्हायरल

जितेंद्र आव्हाड आज महाड येथे करणार मनुस्मृतीचे दहन, वाचा काय आहे प्रकरण !

ब्रेकिंग : पालघरमध्ये रेल्वेचा भीषण अपघात ; डझनभर गाड्या रद्द, रेल्वेकडून हेल्पलाइन क्रमांक जारी

मोठी बातमी : बाबा गुरमीत राम रहीमची हत्याकांड प्रकरणातून निर्दोष मुक्तता

संबंधित लेख

लोकप्रिय