Monday, March 17, 2025

शिंदे – फडणवीस भेटीबाबत अमृता फडणवीसांचा गौप्यस्फोट; “फडणवीस रात्री वेश बदलून…”

नागपुर : राज्यात नुकतेच सत्तांतर झाले आहे. या सत्तासंघर्षाच्या काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची अनेकदा भेट झाल्याचे स्वत: शिंदे यांनी विधानसभेत सांगितले आहे. तसेच सरकार स्थापनेसंदर्भात अनेक गुपित गोष्टींचा उलगडा केला होता. अशात आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र यांच्या भेटीबाबत गौप्यस्फोट केला आहे.

अमृता फडणवीस यांनी देवेंद्र फडणवीस रात्री वेश बदलून शिंदेना भेटायला जायचे असा गौप्यस्फोट केला आहे. त्यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्या म्हणाल्या, फडणवीस रात्री उशीरापर्यंत काम करतात, त्यामुळे माझ्या लक्षात आले नाही, पण कधी-कधी ते रात्री उशीरा वेशांतर करुन बाहेर पडायचे, मलाही त्यांना ओळखणे कठीण जायचे. मी विचारले तर विषय टाळायचे, पण माझ्या लक्षात आले होते की काही तरी सुरु आहे, असे त्या म्हणाल्या.

देवेंद्रजी मुख्यमंत्री होणार नाही, तसेच कोणतंही पद स्वीकरणार नाही, याबाबत मला गर्व वाटत होता. एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री पद दिले, तसेच मुख्यमंत्री पद न मिळाल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना कोणताही फरक पडणार नव्हता, असे अमृता फडणवीस म्हणाल्या. अमृता फडणवीस यांनी दिलेल्या माहितीमुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles