Thursday, November 21, 2024
Homeआंतरराष्ट्रीयब्रेकिंग : बॅलेट पेपरवर निवडणूका घेण्याचा "यांनी" घेतला निर्णय

ब्रेकिंग : बॅलेट पेपरवर निवडणूका घेण्याचा “यांनी” घेतला निर्णय

नवी दिल्ली : सध्या देशभरात इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनबाबत संशयाचे वातावरण आहे. त्यामुळे निवडणुका या बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी सातत्याने केली जात असते. गेल्या लोकसभा निवडणूकीतही विरोधकांनी बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याची मागणी केली होती.

बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याच्या काही राजकीय पक्षांच्या मागणीवर निवडणूक आयोगाने ईव्हीएमवरच निवडणूक घेण्यात येईल असं स्पष्ट केले होते. देशात बॅलेट पेपवर निडणूका घेण्याची मागणी होत असताना शेजारच्याच देशात बॅलेट पेपवर निडणूका होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

बांगलादेशच्या शेख हसीना यांच्या सरकारने ईव्हीएमचा वापर न करता बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बांगलादेशातील यंदाच्या सार्वत्रिक निवडणुकीत बॅलेट पेपरवर होणार आहे. शेख हसीना यांनी बॅलेट पेपरद्वारे देशात लोकसभा निवडणूक घेण्याची विरोधकांची मागणी मान्य केली आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय