Saturday, May 18, 2024
Homeक्राईमलग्नाला नकार दिला म्हणून तिने टीव्ही अँकरचे केले अपहरण; हैद्राबादमधील उद्योजिकेला अटक

लग्नाला नकार दिला म्हणून तिने टीव्ही अँकरचे केले अपहरण; हैद्राबादमधील उद्योजिकेला अटक

प्रेम एकतर्फी असेल, त्यात समजूतदारपणा नसेल, तर मोठ्या समस्या निर्माण होतात. हे आतापर्यंत अनेकदा दिसून आलय. काहीवेळा एकतर्फी प्रेमातून गुन्हेगारी कृत्य करण्यापर्यंत मजल जाते.तो किंवा ती माझीच झाली पाहिजे, ही भावना मनात इतकी घर करते की, माणसू त्यासाठी टोकाच पाऊल उचलायलाही मागेपुढे पाहत नाही. हैदराबादच्या उप्पल पोलीस ठाण्यात एक वेगळच प्रकरण समोर आलय. य़ात महिलेने टीव्ही अँकर प्रणव सिस्ताला किडनॅप केलं. उप्पल पोलिसांनी टीव्ही चॅनलचा अँकर प्रणव सिस्ताच्या किडनॅपिंगच्या आरोपावरुन भोगिरेड्डी तृष्णा नावाच्या महिलेला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोगिरेड्डी तृष्णा एक यंग बिजनेस वुमन आहे. ती एक डिजिटल मार्केटिंग कंपनी चालवते. दोन वर्षांपूर्वी भारत मॅट्रिमोनीवरुन तिची चैतन्या नावाच्या एका युवकाबरोबर ओळख झाली. हा चैतन्या अँकर प्रणवचा फोटो वापरत होता. चैतन्याला प्रणव समजून भोगिरेड्डी तृष्णा त्याच्यावर प्रेम करु लागली. नंतर तिला समजलं की, चैतन्याने प्रणवचा प्रोफाइल फोटो लावलाय. मग तृष्णाने प्रणवला भेटून सर्व सत्य सांगितलं.

त्या महिलेचा व्यवसाय काय?

दोघांनी पोलीस स्टेशनच्या सायबर क्राइम विभागात तक्रार केली. पोलिसांनुसार प्रणव पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. आवड म्हणून तो म्यूजिक चॅनलमध्ये अँकरिंग करतो. डिजिटल मार्केटिंग कंपनी चालवणाऱ्या तृष्णाला ऑनलाइन मॅट्रिमोनी पोर्टलवर प्रणवचा प्रोफाइल फोटो आवडला. चैतन्या ऐवजी तिला प्रणवच्या जवळ जायच होतं. तिने ठरवलं की, लग्न करीन तर प्रणवशीच.
प्रणव कुठेही जायचा, ते तिला समजायच

तृष्णाने प्रणवच्या कारमध्ये ‘ऐप्पल एयर टॅग’ (जीपीएस ट्रैकर) लावला, ज्यामुळे तिला प्रणवच्या प्रत्येक हालचालीवर बारीक लक्ष ठेवता येत होतं. प्रणव कुठेही जायचा, ते तिला समजायच. त्याला प्रेमात पाडण्यासाठी सतत त्याच्याशी फोनवरुन बोलायची. पण प्रणवच्या मनात असं काही नव्हतं. आयुष्यभरासाठी जोडीदार म्हणून तो तृष्णाचा विचार करत नव्हता.

संपूर्ण रात्र त्याला एका खोलीत ठेवलं


फेब्रुवारी महिन्याच्या 10 तारखेला मध्यरात्री तृष्णाने चार लोकांच्या साथीने प्रणवची गाडी अडवली. त्याला किडनॅप केलं. प्रणवला किडनॅप केल्यानंतर तृष्णाने संपूर्ण रात्र त्याला एका खोलीत ठेवलं. त्याला भरपूर मारहाण केली. लग्न करण्यासाठी त्याला भाग पाडण्याचा प्लान होता. पण 11 फेब्रुवारीला प्रणव कसाबसा तृष्णाच्या तावडीतून निसटला.
प्रणवने आधी पोलीस ठाण गाठलं

त्यानंतर पीडित प्रणवने उप्पल पोलिसांशी संपर्क साधला व आपल्यासोबत काय घडलं? ते सर्व सांगितंल. तृष्णा विरुद्ध तक्रार नोंदवली. प्रणवच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तपास सुरु केला. आरोपी तृष्णाला अटक केली. तिला रिमांडवर पाठवण्यात आलय. पोलीस अन्य चार आरोपींचा शोध घेत आहेत.

हैद्राबादमधील एका उद्योजीकेला टीव्ही अँकरचे अपहरण केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका अनोळखी व्यक्तीने अँकर असल्याचं सांगून महिलेची फसवणूक केली होती. तिच्याकडून हजारो रुपये उकळले होते. यानंतर महिलेने अँकरचे अपहरण करण्याचा कट रचला. भोगीरेड्डी त्रिशा ही पाच स्टार्टअप कंपन्यांची व्यवस्थापकीय संचालिका आहे. टेलिव्हिजन अँकर प्रणव सिस्टला याने महिलेला लग्नास नकार दिल्यानंतर त्याचे अपहरण करण्यात आले. मेट्रिमोनियल साईटवर प्रोफाईल पाहून त्रिशाने प्रणवशी संपर्क साधला होता. तपासात असं आढळून आलंय की, प्रणवच्या नावाने एका अज्ञात व्यक्तीने मेट्रोमोनियल साईटवर प्रोफाईल तयार केले होते.

३१ वर्षीय त्रिशा डिजिटल मार्केटिंग कंपनी चालवते. या प्रकरणी त्रिशासह तिच्या पाच मित्राना तेलंगणा पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला मैत्री करण्यासाठी पुरुषांचा शोध घ्यायची. त्रिशाने प्रणवच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी त्याच्या कारवर एअरटॅग देखील लावला होता.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय