Friday, May 10, 2024
Homeराजकारणदेवेंद्र फडणवीस यांचा फोटो शेअर करत ‘मै समंदर हू लौटकर जरूर आऊंगा’...

देवेंद्र फडणवीस यांचा फोटो शेअर करत ‘मै समंदर हू लौटकर जरूर आऊंगा’ भाजप नेत्याने सुचक ट्वीट

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या आमदारांनी पुकारलेल्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत आहे. सोमवारी सुप्रीम कोर्टात देखील शिंदे गटाने महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढल्याचे सांगितले आहे. अशातच आता भाजप नेत्याने एक सुचक ट्वीट केले आहे.

भाजप नेते मोहित कंबोज यांनी देवेंद्र फडणवीस यांचा फोटो शेअर करत सोबत फडणवीसांनी विधानसभेत म्हटलेली शायरी शेअर केली आहे. 2019 च्या विधानसभा निकालानंतर राज्यात शिवसेना-भाजपा यांच्यात अभूतपूर्व सत्तासंघर्ष पाहायला मिळाला. या सत्तासंघर्षात मुख्यमंत्रिपदावरून शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन केली आणि उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री बनले. त्यावेळी फडणवीस म्हणाले होते की, “मेरा पानी उतरता देख किनारे पर घर मत बना लेना. मै समंदर हू लौटकर जरूर आऊंगा” असे म्हणाले होते. या शायरी सोबत कंबोज यांनी फडणवीसांचा फोटो शेअर केला आहे.

दरम्यान, शिंदे गट आणि महाविकास आघाडीच्या सध्याच्या या सत्ता संघर्षा मागे भाजपचा हात असल्याचे बोलले जात आहे, मात्र भाजपने हा आरोप फेटाळून लावला आहे. असे असताना भाजपच्या नेत्याकडून भाजपची पुन्हा सत्ता येणार आणि देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार अशा आशयाचे विधान आणि ट्वीट केली जात आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय