Friday, May 10, 2024
Homeराज्यज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांची प्रकृती पुन्हा बिघडली

ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांची प्रकृती पुन्हा बिघडली

पुणे : ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश बाबा आमटे (Dr Prakash baba Amte) यांची प्रकृती पुन्हा बिघडली आहे. आमटेंना पुन्हा इन्फेक्शन झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अशी माहिती अनिकेत आमटे यांनी दिली आहे.

मागील आठवड्यात म्हणजेच १३ जूनदरम्यान, डॅा. आमटे हे बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या दीक्षांत समारंभासाठी पुण्यात आले असता त्यांना ताप आणि खोकल्याचा त्रास जाणवला. म्हणून त्यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. गेले 5 दिवस झाले पुन्हा इन्फेक्शन झाले आहे आणि उच्च ताप आहे. त्यामुळे डॉ. आमटे यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती सुपुत्र अनिकेत आमटे यांनी दिली.

आज काही टेस्ट होतील. त्याचे रिपोर्ट २-३ दिवसांनी येतील. जे काही अपडेट असतील ते सोशल मीडिया वरून कळविले जातील, त्यामुळे बाबांच्या फोनवर कॉल करू नये. उपचार करणाऱ्या डॉक्टरांना पण कॉल करून त्रास देऊ नये, असे आवाहन अनिकेत आमटेंनी केले आहे.

तसेच प्रकाश आमटे त्यांची प्रकृती बिघडल्याने सर्व व्हिजीटर्सना प्रवेश बंद केला आहे. त्यामुळे भेटीची अपेक्षा आणि आग्रह करू नये असे आवाहन करत हॉस्पीटलमध्ये आल्यास खाली रजिस्टर ठेवले आहे त्यावर शुभेच्छा संदेश, नाव, पत्ता, मोबाईल नंबर लिहावा. असे आवाहन अनिकेत आमटे यांनी केले आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय