Monday, March 17, 2025

SFI कार्यकर्ता अभिमन्यूचा RSS च्या कार्यकर्त्यांकडून हत्या

WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

केरळ : केरळच्या अलप्पुझा जिल्ह्यातील कायमकुलम जवळील वाल्लिकुन्नम येथे उजव्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) कार्यकर्त्यांनी काल (14 एप्रिल 2021) स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाचा कार्यकर्ता अभिमन्यूला चाकूने भोकसून ठार केल्याची दुर्दैवी घटना घडली.

अभिमन्यू अवघ्या 15 वर्षांचा होता, आणि तो वल्लीकुन्नम येथील अमृता शाळेतील इयत्ता अकरावीचा विद्यार्थी होता. हल्लेखोर अभिमन्यूचा मोठा भाऊ अनंतू याचा शोध घेण्यासाठी आले होते. जो डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडियाचा कार्यकर्ता आहे. जेव्हा त्यांना अनंतू सापडला नाही तेव्हा त्यांनी त्याच्याऐवजी अभिमन्यूला ठार मारले.

विशु उत्सवाच्या दिवशी ही हत्या करण्यात आल्याची ही दुर्दैवी घटना आहे. संघ परिवाराचा रक्तपात मुलांनाही सोडत नाही, अशी टिका करत स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया आणि डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडियाने या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles