Saturday, May 18, 2024
Homeहवामानभारतीय हवामान खात्याकडून कडून 5 दिवसांसाठी राज्याला गंभीर इशारा; ऑरेंज अलर्ट

भारतीय हवामान खात्याकडून कडून 5 दिवसांसाठी राज्याला गंभीर इशारा; ऑरेंज अलर्ट

पुणे : मे महिन्याच्या सुरुवातील विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाऊस पडणार आहे. या पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. एप्रिल महिन्यात पूर आल्याची परिस्थिती देशात आणि राज्यात अनेक ठिकाणी दिसली. त्यामुळे राज्यातील तापमान घसरले आहे. राज्यात अनेक ठिकाणी गारपीट झाली आहे.

आता हवामान विभागाने पुढील पाच दिवसांसाठी गंभीर इशारा दिला आहे. मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाट आणि हलका ते मध्यम पाऊस होणार असल्याचे म्हटले आहे. राज्यातील काही जिल्ह्यात काही ठिकाणी गारपिटीचीही शक्यता आहे.

राज्यात पुढील चार दिवस अवकाळी पावसाचे संकट कायम आहे. ३० एप्रिल तसेच १, २ व ३ मे रोजी अवकाळी पाऊस पडणार आहे. गारपिटीसह हा पाऊस राज्यातील अनेक भागांत असणार आहे. त्यासाठी काही जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी केला आहे. ३० एप्रिल रोजी मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पाऊस पडणार आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय