जुन्नर : जुन्नर तालुक्यातील माजी नगराध्यक्ष दिनेश दुबे यांचा कोरोनाने मृत्यू झाला. तालुक्यातील हा सातवा बळी आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव अजूनही कमी होताना दिसत नाही. सध्या जुन्नर तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या २८१ वर गेली असून ७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यात जुन्नरचे माजी नगराध्यक्ष दिनेश दुबे यांचा कोरोनाने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
जुन्नर शहराचे माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते दिनेश दुबे यांचा पुणे येथे रुग्णालयात उपचारादरम्यान आज पहाटे निधन झाले आहे. कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांच्यावर पुणे येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. परंतु त्यांची कोरोनाशी झुंज अपयशी ठरल्याने त्यांचे निधन झाले आहे. दिनेश दुबे यांच्या निधनाने जुन्नर शहरावर शोककळा पसरली असून भीतीचे हि वातावरण पसरले आहे.
सध्या जुन्नर तालुक्यात एकूण रुग्ण संख्या २८१ वर गेली आहे. तर सात रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यात १०५ बाधित बरे होऊन घरी गेले असून सध्या १७० ऍक्टिव्ह केसेस आहेत.