Saturday, May 18, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडएस.एम.जोशी कॉलेजमध्ये सेवापुर्ती सत्कार समारंभ संपन्न

एस.एम.जोशी कॉलेजमध्ये सेवापुर्ती सत्कार समारंभ संपन्न

हडपसर : रयत शिक्षण संस्थेच्या एस. एम. जोशी कॉलेजमधील प्रा. डॉ.सुनील खुंटे (वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख), प्रा. डॉ. मल्हारी रास्ते (रसायनशास्त्र विभागप्रमुख) व रामदास सांगळे (लॅब असिस्टंट) यांच्या सेवापुर्ती सत्कार समारंभ संपन्न झाला.

यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून रयत शिक्षण संस्थेचे, उपाध्यक्ष आमदार चेतन तुपे पाटील व कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून रयत शिक्षण संस्थेचे, जनरल बॉडी सदस्य दिलीप तुपे यांनी तिनही सत्कारमूर्तीना पुढील भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज, पंढरपूर येथील प्राचार्य डॉ.चंद्रकांत खिलारे म्हणाले की, अत्यंत खडतर प्रवास करीत या पिढीने शिक्षण घेतले. अनेक बदलांचा स्वीकार करीत नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करून अनेक विद्यार्थी घडविले. रयत शिक्षण संस्थेमधून दीर्घकाळ सेवा करून सेवानिवृत्त होणाऱ्या सेवकांची पोकळी भरली जाणार नाही. विद्यार्थ्यांच्या जडण घडणीमध्ये प्राध्यापकांप्रमाणेच कार्यालयीन सेवकांचे योगदानही महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.

कर्मवीर भाऊराव पाटील यांचा वसा आणि वारसा घेवून रयत सेवक सेवानिवृत्त होईपर्यंत आणि त्यानंतरही कार्य करीत आहेत. म्हणून रयत शिक्षण संस्थेमधून उत्तम दर्जाचे विद्यार्थी घडत आहेत. असे मत प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे यांनी व्यक्त केले.

प्रा. डॉ.सुनील खुंटे, प्रा. डॉ. मल्हारी रास्ते व रामदास सांगळे यांनी रयत शिक्षण संस्थेत अत्यंत प्रामाणिकपणे व निष्ठेने सेवा केली. त्यामुळे त्यांच्या हातून अनेक चांगले विद्यार्थी घडले. हे तिनही रयतेचे गुणी सेवक असल्याचे गौरवउद्गार प्राचार्य डॉ. एन. एस. गायकवाड यांनी काढले. कार्यक्रमाच्या प्रसंगी सत्कारमूर्ती यांचे नातेवाईक, प्राध्यापक व कार्यालयीन सेवक यांनी आपली मनोगते व्यक्त केली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्टाफ वेलफेअरचे चेअरमन डॉ.अतुल चौरे यांनी तर पाहुण्यांचा परिचय स्टाफ अकॅडमीचे चेअरमन डॉ.शहाजी करांडे यांनी करून दिला. सूत्रसंचालन डॉ.नम्रता कदम व प्रा.प्रसाद वाळिंबे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार उपप्राचार्य डॉ.संजय जगताप यांनी मानले. कार्यक्रमासाठी आय.क्यू.ए.सी. समन्वयक प्रा.डॉ.किशोर काकडे, उपप्राचार्य प्रा.संजय जडे, सर्व प्राध्यापक, कार्यालयीन सेवक, विद्यार्थी वर्ग, सत्कारमूर्ती यांचे कुटुंबीय व नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हे ही वाचा :

भारतीय नौदलात तब्बल 1365 अग्निवीर पदांची भरती; आजच करा अर्ज

NDA & NA : राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी अंतर्गत बंपर भरतीची घोषणा; 12वी उत्तीर्णांसाठी मोठी संधी..!

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत 209 पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती

पुणे येथे चित्रपट आणि दूरदर्शन संस्थेत भरती; 10वी, 12वी, पदवीधर, डिप्लोमा, ITI उत्तीर्णांना संधी

वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत भरती; 10वी उत्तीर्णांना नोकरीची संधी

सोलापूर महानगरपालिका अंतर्गत 127 पदांची भरती

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय