Saturday, May 18, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : जेष्ठ नेते आझम पानसरे यांची शरद पवार यांना साथ; अजित...

PCMC : जेष्ठ नेते आझम पानसरे यांची शरद पवार यांना साथ; अजित पवार गटाला धक्का

पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर : पिंपरीचे माजी महापौर आझम पानसरे यांनी शरद पवार यांची भेट घेतली, यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष तुषार कामठे होते. Senior leader Azam Pansare supports Sharad Pawar

राष्ट्रवादीमध्ये फ़ूट पडल्यानंतर पानसरे कोणाबरोबर याची शहरात चर्चा होती. या चर्चेला आता पूर्णविराम मिळला आहे. मूळचे राष्ट्रवादीचे असणारे पानसरे महापालिका आणि राज्यात सत्तांतर झाल्यानंतर भाजपमध्ये गेले होते. मात्र, तेथे नीट बस्तान न बसल्याने त्यांनी भाजपमधून बाहेर पडून स्वगृही परतणे पसंत केले. अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादी दुभंगली. पिंपरी चिंचवडमधील बहुसंख्य राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याबरोबर गेले. तर इतर नेते कार्यकर्ते तटस्थ होते. या पार्श्वभूमिवर पानसरे कोणाबरोबर हा प्रश्न अनुत्तरित होता. त्याचे उत्तर आज जनतेला मिळाले आहे. 

पानसरे यांना मानणारा मोठा वर्ग शहरात आहे. अजित पवार यांच्याशी त्यांचे फ़ारसे सख्य नव्हते. रविवारी सकाळी शरद पवार यांची त्यांनी भेट घेतली व बंद दाराआड चर्चा झाली. पिंपरी चिंचवडच्या राजकारणात आझम पानसरेंचे चांगले वजन असल्याचे मानले जात आहे. पिंपरी चिंचवडच्या राजकारणाकडे लक्ष देत आझम पानसरे यांची भेट घेतल्याने अजित पवार गटाने धसका घेतल्याचे मानले जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नवनियुक्त अध्यक्ष तुषार कामठे यांनी शहरात पक्ष संघटन वाढवण्यासाठी जुन्या जाणत्या नेत्याशी संपर्क साधायला सुरवात केली आहे. ते सतत पानसरे यांच्या संपर्कात होती. काही दिवसांपूर्वी आमदार रोहित पवार यांनी तुषार कामठे आणि प्रदेश प्रवक्ते रविकांत वरपे यांच्या समवेत आझम पानसरे यांच्या घरी राजकारणाची खलबतं सुरु केली होती. तुषार कामठे यांच्या सोबत सुलक्षणा शिलवंत, गणेश भोंडवे, शिरीष जाधव, काशिनाथ जगताप, मुख्य प्रवक्ते माधव पाटील, राजन नायर, देवेंद्र तायडे, प्रशांत सपकाळ यांचा समावेश होता.

जेष्ठ नेते आझम पानसरे यांच्यासारखा वजनदार

नेता शरद पवार गटाला वजनदार नेता मिळाला आहे. येत्या निवडणुकांमध्ये पानसरे शहरात अजित पवार गटासमोर कितपत आव्हान उभे करू शकतात त्यावर ब-याच गोष्टी अवलंबून आहेत.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय