Friday, November 22, 2024
Homeताज्या बातम्याRohit Pawar : स्वयंघोषित गांधी अण्णा हजारे 2014 नंतर गायबच झाले -...

Rohit Pawar : स्वयंघोषित गांधी अण्णा हजारे 2014 नंतर गायबच झाले – रोहित पवार यांची टीका

Rohit Pawar : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांनी स्वयंघोषित गांधी म्हणत टीका केली आहे. “स्वयंघोषित गांधी अण्णा हजारे २०१४ नंतर अचानक गायबच झाले,” अशी केली आहे.

२०१४ मध्ये अण्णा हजारे (Anna Hazare) यांनी आपल्या आंदोलनांमुळे देशभरात एक वेगळे स्थान निर्माण केले होते. त्यांनी भ्रष्टाचाराविरोधात आणि जनलोकपाल विधेयकासाठी मोठी लढाई लढली होती. मात्र, २०१४ नंतर त्यांची सक्रियता कमी झाली. तसेच भाजपच्या धोरणांवर तसेच देशभरातील विविध घडामोडींंवर देखील त्यांनी मौन धरले आहे. त्यांच्या या भुमिकेवर वारंवार टीका करण्यात येत असते. अशात आता रोहित पवार यांनी देखील अण्णा हजारे (Anna Hazare) यांच्यावर निशाणा साधला आहे.

रोहित पवार यांनी म्हणाले आहे की, 2014 पूर्वी प्रत्येक विषयांवर आंदोलन करणारे, प्रतिक्रिया देणारे तथाकथित स्वयंघोषित गांधी 2014 नंतर मात्र देशात एवढ्या मोठ्या प्रमाणात घडामोडी घडत असताना आणि लोकशाही शेवटच्या घटका मोजत असतानाही शांतच राहिले नाही तर गायबही झालेत.

Rohit Pawar

तसंच पुढे ते म्हणाले की, “खरे गांधीवादी असते तर संविधानाशी छेडछाडपासून मणिपूर अत्याचार, कुस्तीपटू आंदोलन अशा प्रत्येक प्रकरणावर गप्प न बसता बोलले असते, लढले असते. असो! ज्येष्ठ म्हणून आदर आहेच पण गांधीवादाचा मुखवटा घालून सोयीची आंदोलने करून जनतेच्या भावनांशी खेळणं योग्य नाही”, अशी टीका देखील रोहित पवारांनी (Rohit Pawar) यावेळी केली.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

ब्रेकिंग : अमिताभ बच्चन यांचा डुप्लिकेट म्हणून ओळखले जाणारे, अभिनेता फिरोज खान यांचे निधन

ब्रेकिंग : आरोग्यसेवक, ग्रामसेवक परिक्षांचे वेळापत्रक जाहीर!

मोठी बातमी : डोंबिवली एमआयडीसीमध्ये भीषण स्फोट, अनेक इमारतींच्या काचा फुटल्या

काँग्रेस आमदार पी. एन. पाटील यांचे निधन

Pune : पुणे येथे नोकरीची संधी; आजच करा ऑफलाईन अर्ज!

मोठी बातमी : MDH आणि Everest मसाल्यांबाबत FSSAI च्या रिपोर्टमध्ये नवीन खुलासा

ब्रेकिग : 10 वीच्या निकाल कधी लागणार ?, शालेय शिक्षण मंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती

मोठी बातमी : 2010 पासूनचे 5 लाख ओबीसी प्रमाणपत्र रद्द, हायकोर्टाचा निर्णय

इयत्ता १२ वी परीक्षेच्या निकालानंतर बोर्डाचा मोठा निर्णय

मोठी बातमी : महाराष्ट्रातील मुलींना मोफत उच्च शिक्षण मिळणार

सध्या चर्चेत असलेल्या पोर्शे कारची किंमत किती? जाणून घ्या!

बस ड्रायव्हर, ट्रक ड्रायव्हर यांना निबंध का लिहिण्यास सांगितला जात नाही पुण्यातील अपघातावर राहुल गांधी यांची प्रतिक्रिया

‘देवाला बनवले पंतप्रधान मोदींचे भक्त’ भाजप नेते संबित पात्रा यांचे वादग्रस्त विधान

कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणप्रकरणी भाजप नेते ब्रिजभूषण सिंग यांची न्यायालयात महत्वाची माहिती

मोठी बातमी : पुणे अपघात प्रकरणी विशाल अग्रवालला अटक, वाचा अपघातातील धक्कादायक बाबी

संबंधित लेख

लोकप्रिय