Dombivli Blast : डोंबिवलीतील एमआयडीसी परिसरात भीषण स्फोट झाल्याची माहिती समोर येत आहे. एमआय़डीसीतील कंपनीतील बॉयलरमधे ब्लास्ट झाला असून एमआयडीसी फेज-२ मधील कंपनीत ब्लास्ट झाल्याचे सांगितले जाते. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे काम सुरु आहे.
अधिक माहिती अशी कि, डोंबिवली एमआयडीसीतील अंबर केमिकल कंपनीत दुपारी भीषण स्फोट झाल्याची माहिती समोर येत आहे. हा स्फोट झाल्यानंतर डोंबिवली परिसरातील अनेक किलोमीटरपर्यंत या स्फोटाचे हादरे जाणवले. यात काही इमारतींच्या काचा फुटल्याची माहिती आहे. या स्फोटाचे नेमके कारण अद्याप समजू शकलेली नाही. मात्र, डोंबिवली एमआयडीसीपासून (Dombivli MIDC) लांबच्या अंतरावर असलेल्या परिसरातूनही आकाशात उठत असलेले काळ्या धुराचे प्रचंड लोट स्पष्टपणे दिसत आहेत.
या स्फोटाची तीव्रता ईतकी होती की, या परिसरातील अनेक इमारतींच्या काचा फुटल्या आहे. यावरून स्फोटाचा अंदाज बांधला जात आहे. या परिसरात धुराचे प्रचंड लोट बघायला मिळत आहे. एमआयडीसी फेज-२ मधील कंपनीत ब्लास्ट झाल्याचे सांगितले जाते.
Dombivli Blast
दरम्यान, या दुर्घटनेत सहा ते सात कामगार गंभीररित्या जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.


हेही वाचा :
काँग्रेस आमदार पी. एन. पाटील यांचे निधन
Pune : पुणे येथे नोकरीची संधी; आजच करा ऑफलाईन अर्ज!
मोठी बातमी : MDH आणि Everest मसाल्यांबाबत FSSAI च्या रिपोर्टमध्ये नवीन खुलासा
ब्रेकिग : 10 वीच्या निकाल कधी लागणार ?, शालेय शिक्षण मंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती
मोठी बातमी : 2010 पासूनचे 5 लाख ओबीसी प्रमाणपत्र रद्द, हायकोर्टाचा निर्णय
इयत्ता १२ वी परीक्षेच्या निकालानंतर बोर्डाचा मोठा निर्णय
मोठी बातमी : महाराष्ट्रातील मुलींना मोफत उच्च शिक्षण मिळणार
सध्या चर्चेत असलेल्या पोर्शे कारची किंमत किती? जाणून घ्या!
‘देवाला बनवले पंतप्रधान मोदींचे भक्त’ भाजप नेते संबित पात्रा यांचे वादग्रस्त विधान
कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणप्रकरणी भाजप नेते ब्रिजभूषण सिंग यांची न्यायालयात महत्वाची माहिती
मोठी बातमी : पुणे अपघात प्रकरणी विशाल अग्रवालला अटक, वाचा अपघातातील धक्कादायक बाबी
राज्यात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे सरासरी ५४.३३ टक्के मतदान
अलिशान कारच्या धडकेत दोघांचा मृत्यू ; निबंध लिहिण्यासह इतर अटी टाकत 15 तासांत जामीन मंजूर