Friday, May 17, 2024
Homeआंतरराष्ट्रीयआपल्या देशाची अवस्था पाहून खेळाच्या मैदानात गळ्यात पडून रडले खेळाडू

आपल्या देशाची अवस्था पाहून खेळाच्या मैदानात गळ्यात पडून रडले खेळाडू

युक्रेन : रशिया आणि युक्रेनमधील युद्धाची तीव्रता वाढली आहे. देशाच्या भवितव्याची चिंता युक्रेनच्या नागरिकांना सतावत असून खेळाच्या सामन्यादरम्यान प्रेक्षक युक्रेनचा झेंडा आणि बॅनर घेऊन आपल्या देशाचे समर्थन करताना दिसले.

प्रीमियर लीगमधील मँचेस्टर युनायटेड आणि वॅटफोर्ड यांच्यातील सामन्यादरम्यान आपल्या देशाची अवस्था पाहून मँचेस्टर सिटीचा बचावपटू अलेक्झांडर जिनचेन्को रडताना दिसला. त्याने आपला सहकारी युक्रेनियन खेळाडू विटाली मायकोलेन्कोला मिठी मारली आणि एकमेकांच्या गळ्यात पडून रडले. त्यावेळी त्यांच्या संघांनी युक्रेनचा झेंडा दाखवून ‘युद्ध न करण्याचा’ संदेश दिला. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दरम्यान, या मॅचपेक्षा युक्रेनच्या दोन खेळाडूंनी घेतलेली भावुक गळाभेट याची चर्चा होत आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय