Friday, April 26, 2024
HomeNewsशाळा विद्यालयासमोरील धोकादायक होर्डिंग ताबडतोब काढा-संजीवन सांगळे

शाळा विद्यालयासमोरील धोकादायक होर्डिंग ताबडतोब काढा-संजीवन सांगळे

पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर: रावेत या ठिकाणी दुर्घटना घडली व त्यामध्ये निष्पाप नागरिकांना आपला जिव गमवावा लागला ही अतिशय गंभीर व काळजी करण्यासारखी गोष्ट आहे. आपल्या पिंपरी चिंचवड शहरातील बऱ्याच लहान मुलांच्या शाळेच्या समोर आणि शाळेच्या बस ज्या ठिकाणी उभा राहतात अशा ठिकाणी खूप मोठे होर्डिंगचे सांगाडे उभे केलेले आहेत.

सिटीप्राईड,एसएनबीपी,प्रियदर्शिनी या मोशी भागातील शाळा परिसरात होर्डिंग आहेत.ही खूप धोकादायक बाब आहे. सदर होर्डिंगसाठी कोणी कशी परवानगी दिली हे अनाकलनीय आहे.तरी धोकादायक असलेली लहानमोठी सर्व होर्डिंग आपण त्वरित काढून टाकावित अशी मागणी चिखली-मोशी-पिंपरी चिंचवड हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे यांनी मनपा आयुक्त शेखर सिंह यांना एका निवेदनाद्वारे केली आहे.

अनधिकृत होर्डिंग व फ्लेक्स लावणाऱ्या नागरिक,राजकीय पक्षाचे नेते यांना निवडणूक लढवण्यास प्रतिबंध करता येईल का,अशाप्रकारे काही करता येईल का,यावर विचार व्हावा आणि कोणत्याही राजकीय दबावाखाली न येता आशा सर्व होर्डिंग काढून आपल्या सुंदर पिंपरी चिंचवड शहराचे विद्रुपीकरण थांबवावे,मनपाच्या आकाशचिन्ह विभागाच्या गलथान कारभारावर टीका करताना संजीवन सांगळे यांनी निवेदनात म्हटले आहे की,शहरात विविध राजकीय नेत्यांचे कार्यकर्त्यांचे वाढदिवस व इतर कार्यक्रमाचे होर्डिंग फ्लेक्स लागतात.हा विभाग राजकीय दबावाखाली काम करत आहे.असा आरोप करण्यात आला आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय