Friday, May 17, 2024
Homeराजकारणब्रेकिंग : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना कोर्टाचा पुन्हा झटका, कोठडीत पुन्हा...

ब्रेकिंग : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना कोर्टाचा पुन्हा झटका, कोठडीत पुन्हा वाढ

मुंबई : मुंबईच्या गोरेगावमधील पत्राचाळ प्रकरणी अटकेत असलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना कोर्टाने पुन्हा झटका दिला आहे. संजय राऊत यांना आज ईडीच्या विशेष PMLA कोर्टामध्ये हजर करण्यात आले. कोर्टाने राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत पुन्हा वाढ केली आहे.

गोरेगाव पत्राचाळ प्रकरणात ईडीने 30 जुलै रोजी संजय राउत यांना अटक केली होती. यानंतर 8 ऑगस्ट रोजी न्यायालयाने संजय राऊतांना न्यायालयीन कोठडी सुनावली. दरम्यान, पत्राचाळ प्रकरणी ईडीची चौकशी सुरू असल्याने ईडीकडून संजय राऊतांची न्यायालयीन कोठडी वाढवण्याची मागणी करण्यात आली. यावर कोर्टाने त्यांना 5 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे त्यांचा कारागृहातील मुक्काम आतावाढला आहे. संजय राऊतांचा मुक्काम सध्या ऑर्थर रोडच्या मध्यवर्ती कारागृहात आहेत.

काय आहे प्रकरण?
पत्रा चाळ जमीन घोटाळा 2007 मध्ये सुरू झाला. हा घोटाळा प्रवीण राऊत, गुरु आशिष कन्स्ट्रक्शन अँड हाऊसिंग डेव्हलपमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडसह महाराष्ट्र गृहनिर्माण व विकास प्राधिकरण (म्हाडा) यांच्या संगनमताने करण्यात आल्याचा आरोप आहे. पत्रा चाळीच्या पुनर्विकासाचे काम म्हाडाने गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीला दिले होते. यामध्ये 1034 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणात संजय राऊतचा मित्र प्रवीण राऊत आरोपी आहे. बांधकाम कंपनीने चाळीतील लोकांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. ही कंपनी प्रवीण राऊत यांच्या मालकीची आहे. पत्रा चाळमध्ये तीन हजार फ्लॅट बांधले जाणार होते. चाळीतील रहिवाशांना 672 फ्लॅट मिळणार होते. खासगी बिल्डरांना जमीन विकल्याचा आरोप आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय