Wednesday, January 22, 2025

संभाजी भिडे यांचे स्वातंत्र्य दिनाबाबत वादग्रस्त विधान

मुंबई : शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे हे सातत्याने आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा भिडे बरळले आहेत. भिडे यांनी स्वातंत्र्यदिन आणि तिंरग्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी स्वातंत्र्यदिनाबद्दल वादग्रस्त वक्तव्य करताना, 15 ऑगस्ट हा खरा स्वातंत्र्यदिन नाही, तर ‘वंदे मातरम’ गीत राष्ट्रगीत नाही असं म्हणत ते पुन्हा एकदा बरळले. भिडे यांच्या वक्तव्यामुळे नवा वाद उभा राहिला असून राज्यातील राजकीय वातारवण चांगलचं तापलेलं आहे. त्यावरून शिवसेना (ठाकरे गट) नेते, आमदार सचिन अहिर, काँग्रेसचे प्रवक्ते, नेते राजू वाघमारे यांनी टीका केली आहे.

जन गण मन हे राष्ट्रगीत होऊ शकत नाही. कारण रवींद्रनाथ टागोर यांनी १८९८ रोजी हे राष्ट्रगीत इंग्लंडच्या राज्याच्या स्वागतासाठी लिहिले होते. त्यामुळे १५ ऑगस्ट हा आपला खरा स्वातंत्र्य दिवस नाही. उलट या दिवशी भारताची फाळणी झाली होती. त्यामुळे या दिवशी सर्वांनी उपवास करून दुखवटा पाळावा असं संभाजी भिडे यांनी म्हटलंय.

यावरूनच आता संभाजी ब्रिगेड देखील आक्रमक झाली आहे. तर आज संभाजी भिडे यांच्या त्या वक्तव्याचा जाहिर निषेध केला जाणार आहे. संभाजी ब्रिगेडकडून ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर भिडे यांच्याविरोधात आंदोलन करण्यात येणार आहे.

हे ही वाचा :

ZP : गोंदिया जिल्हा परिषद अंतर्गत विविध पदांसाठी भरती

संभाजी भिडे यांचे स्वातंत्र्य दिनाबाबत वादग्रस्त विधान

मोठी बातमी : उध्दव ठाकरे व संजय राऊत यांना कोर्टाचं समन्स

Railway : पश्चिम रेल्वे मुंबई मार्फत 3624 जागांसाठी आजपासून अर्ज प्रक्रिया सुरु; आजच करा अर्ज

बीड जिल्हा रुग्णालय अंतर्गत ‘तांत्रिक पर्यवेक्षक’ पदाची भरती; DMLT उत्तीर्णांना नोकरीची संधी

ZP : नागपूर जिल्हा परिषद अंतर्गत ‘डेटा विश्लेषक’ पदाची भरती; ई-मेल द्वारे करा अर्ज

NHM गडचिरोली अंतर्गत 80 पदांसाठी भरती; 30 जून 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख

Related Articles

- Advertisement -

Latest Articles