Saturday, May 11, 2024
Homeराज्यमोठी बातमी : उध्दव ठाकरे व संजय राऊत यांना कोर्टाचं समन्स 

मोठी बातमी : उध्दव ठाकरे व संजय राऊत यांना कोर्टाचं समन्स 

मुंबई : मुंबईतील शिवडी न्यायदंडाधिकारी न्यायालयानं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि पक्षाचे खासदार संजय राऊत यांना समन्स बजावत 14 जुलै रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांच्याविरोधात सामना मुखपत्रातून बदनामी करणारी खोटी बातमी केल्याप्रकरणी शेवाळेंनी दाखल केलेल्या मानहानीच्या अर्जावर न्यायालयानं हे समन्स जारी केले आहे.

शिंदे यांच्या बंडानंतर ठाकरे गट आणि शिंदे गटात टिकास्त्र रंगलेले पहायला मिळत आहे. 29 डिसेंबर 2022 रोजी सामना या मुखपत्राच्या हिंदी आणि मराठी आवृत्तीमध्ये प्रकाशित एका लेखात राहुल शेवाळे यांचे दुबई तसेच पाकिस्तानातील कराचीत रिअल इस्टेटमध्ये हितसंबंध असल्याचा दावा करण्यात आला होता. यावर शेवाळे यांनी वकील चित्रा साळुंखे यांच्या मार्फत 3 जानेवारी 2023 रोजी नोटीस पाठवून या लेखातील दाव्यांचा स्त्रोत काय? अशी विचारणा केली होती. त्यावर, एका महिलेने इंटरनेटवर केलेला दावा आणि अन्य माहितीच्या आधारावर हा लेख लिहील्याचं सामनाकडून प्रत्युत्तरात सांगण्यात आलं.

या उत्तरानंतर शेवाळेंनी दंडाधिकारी न्यायालयात फौजदारी मानहानीची तक्रार दाखल केली आणि मुंबई उच्च न्यायालयात 100 कोटी रुपयांचा मानहानीचा दावाही दाखल केला आहे. दंडाधिकारी न्यायालयाने ट्रॉम्बे पोलिसांना फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 202 अंतर्गत तपास करण्याचे आदेश दिले आहेत. तर दुसरीकडे, पोलिसांनी शेवाळेंना बोलावून त्यांचा जबाबही नोंदवला आहे. ‘सामना’मध्ये प्रसिद्ध झालेला मूळ लेख हा पुरावा म्हणून शेवाळे यांनी सादर केला आहे.

LIC insurance corporation of India
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय