Thursday, November 21, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडराजर्षी शाहू महाराज यांच्या 149 व्या जयंतीनिमित्त "समाजभूषण पुरस्कार 2023 "जयश्री बी...

राजर्षी शाहू महाराज यांच्या 149 व्या जयंतीनिमित्त “समाजभूषण पुरस्कार 2023 “जयश्री बी सोनवणे यांना प्रदान

पुणे / अर्जुन मेदनकर : भिम पँथर सामाजिक संघटनेच्या वतीने सामाजिक क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल साप्ताहिक आपले ज्ञानपंख वृतपत्र उपसंपादिका, ज्ञानपंख 24 न्यूज चॅनलच्या वृत्तनिवेदिका तसेच कार्यकारी संपादिका, एक सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती जयश्री ताई सोनवणे यांना समाजभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. राजर्षी शाहू महाराज यांच्या 149 व्या जयंतीनिमित्त श्रीरामपूर येथील माऊली वृध्दाश्रमात झालेल्या कार्यक्रमात जयश्री ताईंना भीम पॅथर सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव गांगुर्डे यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.

जयश्री सोनवणे या पुण्यातील भोसरी येथे राहतात.सामाजिक व पत्रकारिता क्षेत्रामध्ये आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटवून एक विद्रोही बाणा, रोखठोकपणा उभ्या महाराष्ट्राला दाखवणारं महिला संघटन कौशल्य म्हणून, उदययाला आलेलं महिलांचे कुशल नेतृत्व तथा साप्ताहिक आपले ज्ञानपंख वृत्तपत्राच्या त्या उपसंपादिका तथा ज्ञानपंख 24 न्यूज या चॅनलच्या कार्यकारी संपादिका तथा वृत्त निवेदिका आहेत.

महिलांचे कुशल नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे आज पाहिलं जातं. त्या एक पत्रकार तर आहेतच त्यासोबतच त्या एक उत्तम कवयित्री देखील आहे. तसेच त्या पेशाने वकील जरी नसल्या, तरी जिथे कुठे महिलांवर अन्याय अत्याचार होतो.त्या ठिकाणी अन्यायाला वाचा फोडण्यासाठी त्या हजर असतात.अनेक संस्थांना भेट देऊन गोरगरिबांना मदत मिळवून देणे, सद्य परिस्थितीवर शाळा,कॉलेज या ठिकाणी जाऊन मुलींना परिस्थितीशी दोन हात कसे करायचे यावर मार्गदर्शन करणे. अनेक हॉस्पिटलमध्ये गोरगरिबांची फसवणूक होते. त्या ठिकाणी जाऊन त्यांची फसवणूक न होऊ देणे.त्याचबरोबर त्यांचे जे काही हॉस्पिटलचे बिल असते ते जास्तीचे आकारण्यात येते ते कमी करून देणे म्हणजेच अन्यायाविरुद्ध त्यांची लढत आहे.या सर्व कार्याची दखल घेत त्यांना भीम पॅथर सामाजिक संघटनेकडून यंदाचा “समाजभूषण” पुरस्कार 2023 प्रदान करण्यात आला.

ज्येष्ठ साहित्यिक सुभाष सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी शब्दगंध साहित्य परिषदेचे संस्थापक सचिव सुनिल गोसावी, प्रकाश कुलथे, भिम पँथरचे शिवाजी गांगुर्डे, प्रदेश महासचिव कादीर खान, नानासाहेब शिंदे, कवी रज्जाक शेख, आनंदा साळवे, सुभाष वाघुंडे, राजेंद्र देसाई, आदी मान्यवर उपस्थित होते.

अलंकापुरीत आषाढी एकादशी दिनी लाखावर भाविकांची दर्शनास गर्दी

शहरालगत गहुंजे येथे क्रिकेट स्टेडियम असताना 400 कोटीचे मोशीत स्टेडियम ; उधळपट्टी कशासाठी ? नाना काटे यांचा सवाल

स्टॉर्म वॉटर जोडणी न केल्यामुळे चिखलीत (जाधववाडी) पाणी रस्त्यावर – स्थापत्य विभागाच्या गलथान कारभार – राजू भुजबळ

संबंधित लेख

लोकप्रिय