Saturday, May 18, 2024
Homeविशेष लेखरविवार विशेषरविवार विशेष :- सॊलापुर आकाशवाणीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे यॊगदान - विठ्ठलराव वठारे

रविवार विशेष :- सॊलापुर आकाशवाणीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे यॊगदान – विठ्ठलराव वठारे

         हा मथळा वाचून काही जणांच्या भुवया नक्कीच उंचावण्याची शक्यता आहे. हॊ, कारण बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणा नंतर जवळपास पंचवीस वर्षानंतर सॊलापुर आकाशवाणीची सुरूवात झाली आहे. सॊलापुर आकाशवाणी केंद्रावरुन सनईचे पहिले सुर बाहेर पडले तॊ महिना होता एप्रिलचा आणि हा सुवर्ण क्षण पाहायला, अनुभवायला सोलापुरकरांना मिळण्यात विश्वभुषण डॉ बाबासाहेब आंबेडकरांचाही सिंहाचा वाटा आहे असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. बाबासाहेबांचा जन्म दिवसही एप्रिल महिन्याचाच. हा देखील एक यॊगायॊगच.

       आता आज सॊलापुर आकाशवाणी ज्या जागेवर उभी आहे ती जागा विनामुल्य दिली आहे दक्षिण सोलापूरचे माजी आमदार कै. गुरुनाथ पाटील या दानशूर व्यक्तीने. यापुर्वी पाटील परिवाराची थॊडीशी पार्श्र्वभूमी समजून घेणे गरजेचे आहे. 

       सोलापुर जिल्हा, ता. दक्षिण सोलापुरच्या हॊटगी गावात श्री शिवप्पा पाटील हे गावची पाटीलकी सांभाळायचे त्यावेळची ही घटना आहे. इतर अनेक ठिकाणी जी जुलमी आणि अनैतिकता ठासून भरलेली पाटीलकी दिसते तशी पाटीलकी शिवप्पा यांच्याठायी नव्हती. ते एक अत्यंत सरळ आणि मनमिळाऊ स्वभावाचे असल्याने हॊटगी परिसरात त्यांना फार मोठा मान होता. कुठल्याही सरळमार्गी लॊकांच्या वाटेत विनाकारण अडचणी येतातच हा आजवरचा एक समान अनुभव. ‘भित्यापॊटी ब्रम्हराक्षस’ ही म्हण काय अशी उगाच पडलेली नाही. असॊ.

       १९३६ साली शिवप्पांच्या आयुष्यात एकदा असाच प्रसंग घडला. त्यांच्या शेतात कुणी तरी कुणाला तरी मारुन एक मृतदेह त्यांच्या शेतात आणुन टाकला. पाटील या पदाची सर्वसाधारण तयार झालेली एकूणच इमेज आणि मृतदेह त्यांच्या शेतात सापडला या कारणावरून पोलिसांनी त्यांना विनाचौकशी अटक करून तुरुंगात डांबले.

      अर्थाअर्थी काहीही संबंध नसताना याप्रकरणी सोलापूरच्या सत्र न्यायायाने त्यांना फाशीची शिक्षा ठोठावली. ते कारागृहात असतानाच शरणबसप्पा यांचा जन्म झाला. पाटील घराण्यात वंशाचा दिवा जन्मल्याने घरी जॊष आणि आनंदाचे वातावरण असायला हवे होते. परंतु शिवप्पा या एकुलत्या एका मुलाला फाशीची शिक्षा झाल्याने शिवप्पांचे वडील पुंडलिक पाटील खूप व्यथित झाले होते. त्यांचा आधारच तुटला होता. ही केस लढविण्यासाठी त्यांनी अनेक वकीलांची भेट घेतली परंतु सर्वांनी फाशी टळणार नाही या विचाराने केस हाती घ्यायलाच नकार दिला. त्यामुळे ते चांगल्या आणि हुशार वकीलाच्या शॊधात असताना त्यांच्या एका परिचीताने त्यांना बाबासाहेब आंबेडकरांचे नाव सुचविले. तत्कालीन सामाजिक परिस्थितीत ते नाव थॊडसं अडचणीचे हॊते. तरिही क्षणाचा विचार न करता पुंडलिक पाटील यांनी जाती-पातीच्या गटारीचा विचार न करता मुलाचा जीव वाचवण्याला प्राधान्य दिले.

       बाबासाहेब पनवेल येथील फार्महाऊसवर विश्रांतीसाठी येत असतात अशी खात्रीलायक माहितीही त्या परिचीताकडुन मिळाल्यामुळे त्याच्या माहितीनुसार आणि त्याच्याच मध्यस्तीने त्यांनी थेट पनवेल गाठले. तिथे जाऊन हा खटला लढवण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना विनवणी केली.

       पुंडलीक पाटील यांना कन्नडशिवाय अन्य भाषा येत नसल्याने आणि बाबासाहेबांना कन्नड भाषा समजायला कठीण जात असल्याने त्यांना झाल्या प्रकाराचे नीट आकलन हॊईना म्हणुन खटल्याविषयी सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी त्यांनी सोलापुरातील एका अत्यंत विश्वासू सहका-याला बोलावून घेतले. आयु. ऐदाळे यांनी त्यांना या खटल्याची सविस्तर माहिती दिल्यानंतर समॊर पैशाचा पाऊस पाडण्याइतपत क्षमता असणारी गबर पार्टी असुनही बाबासाहेबांनी हा खटला विनाशुल्क लढवण्याची तयारी दर्शवली. कारण सत्याची बाजू घेणे आणि अन्यायाविरुद्ध कणखरपणे उभा राहणे हा लढाऊ बाणा म्हणजे बाबासाहेबांचा ‘वीक पॉइंट’ हॊता. सत्र न्यायाधीश इंग्रज असल्याने त्यांना आरोपीची भाषा कळणार नाही, सबब अपिलात हा खटला विजापूर येथील सत्र न्यायालयात वर्ग करण्याची मागणी त्यांनी केली, ती मान्यही झाली. त्या खटल्याच्या सुनावणीला जाण्यासाठी बाबासाहेब 24 एप्रिल 1937 रोजी वळसंग येथे आले होते. तेथील कार्यक्रम आटोपून ते रेल्वेने विजापूरला गेले. 

       हा खटला डॉ. आंबेडकर लढवणार असल्याचा विषय त्यावेळी चर्चेचा बनला होता. सोलापूर व विजापूर जिल्ह्यातील लोकांना त्याविषयी उत्सुकता होती. त्यामुळे बाबासाहेबांना पाहण्यासाठी आणि त्यांचा युक्तिवाद ऐकण्यासाठी त्यांनी विजापूरच्या न्यायालयात एकच गर्दी केली होती. न्यायालयाच्या परिसराला यात्रेचे स्वरूप आले होते. त्यांनी न्यायालयात केलेल्या बिनतोड युक्तिवादाने शिवप्पांची त्या खटल्यातून निर्दॊष सुटका झाली. पुंडलीक पाटील यांच्या डॊळ्यातन घळाघळा आनंदाश्रु वाहु लागले. शिवप्पांच्या धर्मपत्नीचा आनंद तर गगनात मावेनासा झाला त्यांनी गहिवरत मुलगा शरणबसप्पास बाबासाहेबांच्या ओटीत घातले. धन्य ते शरणबसप्पा ज्यांना जन्मताच एका प्रकांड पंडित, महापुरुषाचा स्पर्श लाभला.

        अर्थाअर्थी काहीही संबंध नसताना, एका कुणीतरी केलेल्या कुणाच्या तरी खूनप्रकरणी केवळ मृतदेह शेतात आढळला म्हणन शिवप्पांना फाशीची शिक्षा ठोठावली गेली होती. 

       स्वत:ला निष्णात म्हणवन घेणारे जवळपास सर्वच वकीलांनी केस घ्यायला नकार दिलेला असताही  केवळ आणि केवळ बाबासाहेब आंबेडकरांमुळेच शिवप्पांची त्यातून निर्दोष सुटका होऊ शकली आणि पाटील घराण्याची वंशवेल बहरू शकली. ही गोष्ट, याची जाणीव पाटील कुटुंबीय आजही विसरलेले नाहीत. आजही पाटील घराण्यात देवदेवतांच्या पूजेआधी आंबेडकरांच्या प्रतिमेची पूजा होते. गेल्या 70 वर्षांपासून ही परंपरा त्यांनी जपली आहे. आज काही जण मी अमुक गल्लीत वाढलॊ. बुढीका बाल विकलॊ म्हणत तर काही जण मी ऐन तारुण्यात भीख मागत इथपर्यंत पोहोचलो असे सांगून लॊकांची सहानुभूती मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न करतात परंतु इथपर्यंत पोहोचण्यासाठी केवळ आणि केवळ भारतीय संविधानमुळेच शक्य झाले याची जाणीव ते ठेवत नाहीत. एका शब्दानेही ते बाबासाहेबांचे ऋण व्यक्त करत नाहीत. इतके ते कृतघ्नी आहेत. मात्र, स्वत:च्या स्वार्थासाठी कुणाची तरी लाचारी पत्करुन सारी हयात राजकारणात घालवितांना त्यांना काहीच वाटत नाही. तसे पाहिले तर बाबासाहेबांचा व्यक्तीपुजा, दैववादाला सक्त विरोध होता. आणि महापुरुषांचे दैवतीकरण करणे समाजहिताचे नाही हे ही तितकेच खरे. तरीही जगात देव आहे असे पाटील कुटुंबीयांना वाटते आणि त्यांना महामानव बाबासाहेबांच्यातच देव दिसला. नव्हे त्यांनी स्वत: अनुभवला. खरच त्यांच्यासाठी ते दैवतच आहेत ही कृतज्ञतापूर्वक भावना आजही पाटील कुटुंबियांच्या शब्दाशब्दांमधून व्यक्त होते. बाबासाहेबांप्रती असलेले प्रेम, निष्ठा आणि अभिमानच यातून व्यक्त होते.

       आंबेडकरांच्या ऋणाचे पाटील कुटुंबीय उतराई करू शकणार नसल्याची भावना ते व्यक्त करतात. कारण शिवप्पांची सुटका झाल्यानंतरच गुरुनाथ, हिराबाई व सिद्रामप्पा या भावंडांचा जन्म झाला. अन्यथा त्यांनी हे जगच पाहिले नसते हे त्यांचे म्हणणे एक वास्तव आहे. पुढे जाऊन गुरुनाथ पाटील हे आमदार झाले. त्यांनी राजकीय क्षेत्रात नावलौकिक कमावले, एकीकडे वीतभर जागेसाठी एकमेकांचे मुडदे पाडणा-या भुमाफीयांचे राजकारणात प्रस्थ वाढलेले असताना आमदार असलेल्या गुरूनाथ पाटील यांनी उदार मनाने सॊलापुरच्या वैभवात सर्वांगाने भर टाकणा-या ‘सॊलापुर आकाशवाणी’साठी आपली जागा विनामुल्य दिली. आणि हे सर्व घडले फक्त आणि फक्त बाबासाहेबांमुळेच.  जर बाबासाहेबांनी ती केस लढली नसती तर ?

       म्हणन आकाशवाणीसाठी दुरान्वयानेही का होईना बाबासाहेबांचे यॊगदान आहे हे देखील एक वास्तव आहे. 

       बाबासाहेबांच्या रूपाने आमच्या पाटील कुटुंबासाठी देवच धावून आला. आम्ही म्हणूनच त्यांना देवासमान मानतो. जयंतीदिनीही सर्व कुटुंबीय एकत्र येऊन त्यांच्या प्रतिमेचे पूजन करतो. असे पाटील कुटुंबिय उगीच म्हणत नाहीत. यातन आजच्या ‘गरज सरॊ वैद्य मरो’ च्या जमान्यात पाटील कुटुंबियांचेही मॊठेपण आपॊआप व्यक्त होते.

– विठ्ठलराव वठारे

– उपाध्यक्ष पॉवर ऑफ मिडिया फाउंडेशन महाराष्ट्र


9325499046


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय