Friday, May 17, 2024
Homeराज्यसाहित्यिक नंदा खरे यांनी नाकारला साहित्य अकादमी पुरस्कार

साहित्यिक नंदा खरे यांनी नाकारला साहित्य अकादमी पुरस्कार

मुंबई : साहित्यिक नंदा खरे यांच्या उद्या या कादंबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. मात्र खरे हा पुरस्कार स्वीकारणार नसल्याची माहिती मिळत आहे. कोणताही पुरस्कार स्वीकारायचा नाही अशी भूमिका खरेंनी २०१४ मध्ये घेतली. त्यामुळे खरे साहित्य अकादमी पुरस्कार स्वीकारणार नाहीत. 

साहित्य अकादमीनं आज २० भाषांमधील वार्षिक साहित्य अकादमी पुरस्कारांची घोषणा केली. यात ७ कविता संग्रह, ४ कादंबरी, ५ कथा संग्रह, २ नाटकं आणि प्रत्येकी एका स्मरणिकेचा आणि महाकाव्याचा समावेश आहे. नंदा खरेंच्या उद्या कादंबरीची निवड साहित्य अकादमी पुरस्कारासाठी करण्यात आली आहे. मात्र हा पुरस्कार खरेंनी स्वेच्छेनं नाकारला आहे.

खरे यांनी म्हटले आहे की, माझ्या ” उद्या ” ह्या जानेवारी २०१४ मध्ये प्रकाशित झालेल्या कादंबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहिर झाला आहे. चार एक वर्षापूर्वी मी पुरस्कार न स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. समाजाकडून मला भरपूर मिळालं आहे व यापुढेही घेत राहणे मला इष्ट वाटत नाही. पुरस्कार देणाऱ्या सर्व संस्थांचा आदर राखून व त्यांचे आभार मानून ही माझी भूमिका मी मांडत असल्याचेही खरे यांनी म्हटले आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय