Tuesday, May 7, 2024
Homeराजकारणब्रेकिंग : विधान परिषदेच्या सहाव्या जागेसाठी भाजपकडून ‘हा’ उमेदवार रिंगणात, सर्वांच्या भुवया...

ब्रेकिंग : विधान परिषदेच्या सहाव्या जागेसाठी भाजपकडून ‘हा’ उमेदवार रिंगणात, सर्वांच्या भुवया उंचावल्या

मुंबई : राज्यात राज्यसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांची मतांची जुळवाजुळव सुरू असताना विधानपरिषदेची देखील निवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणूकीसाठी भाजपने काल पाच उमेदवारांच्या नावांची घोषणा केली होती, त्यानंतर आज पुन्हा भाजपने विधान परिषदेसाठी सहावा उमेदवार रिंगणात उतरवला आहे.

भाजपने काल विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी पाच उमेदवारांची घोषणा केली आहे. यात विद्यमान आमदार प्रविण दरेकर, प्रसाद लाड आणि माजी मंत्री राम शिंदे, याशिवाय श्रीकांत भारतीय आणि उमा खापरे यांच्या नावाची घोषणा केली आहे. आता भाजपने सहावा उमेदवार म्हणून सदाभाऊ खोत यांना संधी दिली आहे.

भाजपने आता रयतक्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत यांना विधान परिषदेसाठी उमेदवारी दिली आहे. सदाभाऊ खोत हे राज्यात भाजपची सत्ता असताना देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात होते. या सोबतच सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेने २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला समर्थन दिलं होतं.

विधान परिषदेसाठी सदाभाऊ खोत हे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार असून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यावेळी उपस्थितीत असणार आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय