Sunday, May 19, 2024
Homeराज्यमोठी दुर्घटना : मुंबईतील वांद्रे परिसरातील तीन मजली इमारत कोसळली

मोठी दुर्घटना : मुंबईतील वांद्रे परिसरातील तीन मजली इमारत कोसळली

मुंबई : मुंबईतील वांद्रे परिसरातील तीन मजली इमारत कोसळल्याची घटना घडली आहे. ही इमारत मध्यरात्री 12.30 च्या सुमारास कोसळली असून या घटनेत एकाचा मृत्यू झाला असून 18 जण गंभीर जखमी आहेत, अशी माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वांद्रे येथील शास्त्रीनगर परिसरात मध्यरात्री 12.30 च्या सुमारास एक तीन मजली इमारत कोसळली. तळमजल्यावरील सर्व नागरिक सुखरूप असून, पहिल्या मजल्यावर 6 जणांना किरकोळ दुखापत झाली आहे, तर दुसऱ्या मजल्यावरील 17 जणांना गंभीर दुखापत झाली आहे. या घटनेत एकाच मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच तात्काळ बचाव पथक, अग्निशमन दलाच्या 4 गाड्या, पोलीस, 1 रुग्णवाहिका आणि महापालिकेचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि बचावकार्य तात्काळ सुरु करण्यात आले. अजुनही काही लोक मलब्याखाली अडकल्याची भिती व्यक्त केली जात आहे.

वन विभाग अंतर्गत विविध पदांसाठी भरती, 20000 ते 40000 रूपये पगाराची नोकरी

डीसीपी मंजुनाथ सिंगे यांनी सांगितले की, वांद्रे येथील शास्त्रीनगर भागात मध्यरात्री 12 वाजून 15 मिनिटांच्या सुमारास तीन मजली इमारत कोसळली. तळमजल्यावरील सर्व नागरिक सुखरूप मात्र, पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावरील व्यक्ती गंभीर जखमी झाल्या आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हे सर्व बिहारमधून आलेले मजूर आहेत. या घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. 

दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच या इमारतीच्या शेजारील घर तोडण्यात आल्याने या इमारतीला आधार न  मिळाल्याने इमारत कोसळल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

पुणे येथे 10 वी आणि 12 वी पास करू शकता अर्ज, BRO मध्ये 876 जागांसाठी भरती

भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत 400 पदांसाठी भरती, 40000 रूपये पगाराची नोकरी

भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत 400 पदांसाठी भरती, 40000 रूपये पगाराची नोकरी

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय