Sunday, December 8, 2024
Homeआंतरराष्ट्रीयरशिया - युक्रेन भयानक युद्धाचा इशारा

रशिया – युक्रेन भयानक युद्धाचा इशारा

मॉस्को : अमेरिकेच्या युद्धनौका काळ्या समुद्रात आल्या आहेत. युक्रेन हे अमेरिकेचे मित्र राष्ट्र आहे. रशियाची पूर्वयुरोपात कोंडी करण्यासाठी अमेरिका युक्रेन, पोलंड, जॉर्जिया या देशांमध्ये नाटो मार्फत हस्तक्षेप करत आहे. 2018 मध्ये युक्रेन रशिया यांच्यातील युद्धमुळे जग चिंतीत झाले होते.

आता अमेरिकेने आण्विक युद्ध नौका पाठवल्यामुळे संपूर्ण युरोपला युद्धाचा धोका निर्माण झाला आहे.रशियाने प्रचंड सैन्य आणि विनाशकारी हल्ले करणारे रणगाडे युक्रेन सीमेवर तैनात केले आहेत. करोना महासाथीच्या आजाराचे जगभरात थैमान सुरू असताना दुसरीकडे जगावर महायुद्धाचे सावट आहे. रशियन विश्लेषकांनी आगामी चार आठवड्यांमध्ये महायुद्ध सुरू होणार असल्याचा इशारा दिला आहे. करोना काळात युद्ध झाल्यास त्याचे परिणाम अतिशय भयंकर असणार आहेत.

रशिया आणि युक्रेनच्या सीमेवर वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हा इशारा देण्यात आला आहे. तणाव न निवळल्यास एका महिन्यातच करोना महासाथीच्या काळात भीषण युद्धाचा सामना करावा लागणार असल्याचा इशारा संरक्षण तज्ज्ञांनी दिला आहे. रशियाने वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर चार हजार जवानांना वादग्रस्त सीमा रेषेवर पाठवले आहे. रशियन सैन्याच्या हालचालींमुळे युरोपीयन देशही सतर्क झाले आहेत. त्यामुळे महायुद्ध होण्याचा धोका असल्याचे त्यांनी सांगितले.

रशियन माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, रशियन संरक्षण तज्ज्ञ पॉवेल फेलगेनहर यांनी सांगितले की, ज्या प्रकारची सध्या परिस्थिती आहे, त्यानुसार, येत्या काही आठवड्यात युरोपमध्ये महायुद्धासारखी मोठी घटना घडण्याचा धोका आहे. हा धोका वाढत असून माध्यमांमध्ये याची चर्चा न होणे हे चिंताजनक असल्याचे त्यांनी सांगितले.

रशिया आणि युक्रेनमध्ये जर युद्ध झाल्यास त्याचे रुपांतर महायुद्धात होण्याची शक्यता आहे. रशिया आणि अमेरिका यांच्यात वैर आहे. तर, युक्रेन हा अमेरिकेचा मित्र देश आहे. त्यामुळेच रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यास अमेरिकाही या युद्धात उतरण्याची शक्यता आहे. त्यानंतर इतर देशही सहभागी होतील. काही दिवसांपूर्वीच शस्त्र साठा असलेला एक मालवाहू जहाज अमेरिकेहून युक्रेनमध्ये दाखल झाले.


संबंधित लेख

लोकप्रिय