Sunday, May 19, 2024
Homeराज्यशिधापत्रिकांंबाबत सोशल मिडियावर अफवा, काय आहेत 'अफवा' ?

शिधापत्रिकांंबाबत सोशल मिडियावर अफवा, काय आहेत ‘अफवा’ ?

पुणे : शिधापत्रिका असणाऱ्या व्यक्तीचे एक लाखाहून अधिक उत्पन्न असल्यास किंवा घरात डिश टीव्ही तसेच दुचाकी वाहन असेल किंवा तुमच्याकडे पंक्क घर असेल तर तुमच्या रेशनकार्ड वर मिळणाऱ्या धान्यासह मिळणाऱ्या इतर सुविधा या बंद करण्यात येतील, अशा बातम्या सोशन मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. तर यामध्ये आपल्याला 1 फेब्रुवारी ते 20 एप्रिल 2021 या कालावधीत अपात्र शिधापत्रिकांचा शोध घेण्यासाठी केंद्रसरकारने सूचना दिलेल्या असल्याचे म्हटले गेले आहे.

यामध्ये केशरी, पाढरी, बीपीएल, अंत्योदय, अन्नपूर्णा या सर्व प्रकारच्या रेशन कार्ड म्हणजेच शिधापत्रिकांची तपासणी करण्यात येणार आहे. नागरिक ज्या भागात राहत आहेत, त्या भागातील रहिवासी पुरावा देणे बंधनकारक करण्यात आले आहे. असा पुरावा सादर न केल्यास त्या संबंधिताचे रेशन कार्ड हे रद्द करण्यात येणार आहे, सादर केलेला पुरावा हा एक वर्षापेक्षा जास्त जुना असल्यास तो सुध्दा चालणार नाही.

परंतु दिनांक 28 जानेवारी 2021 रोजी अन्न , नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागातर्फे प्रकाशित झालेल्या अपात्र शिधा पत्रिका मोहिम राबविण्याबाबतच्या जि.आर. मध्ये तसेच इतर शासन परिपत्रकामध्ये व आदेशामध्ये दुचाकी वाहन असल्यास रेशन कार्ड रद्द करण्यात येईल अथवा लाभ देण्यात येणार नाही असा कोणताही उल्लेख केलेला नाही. कुटुंबाचे उत्पन्न जसजसे वाढत जाते तसे तसे रेशन कार्ड बदलत जात असून रेशनकार्ड वर मिळणारा लाभ कमी कमी होत जातो .

मात्र , दुचाकी वाहन आहे म्हणून रेशनकार्ड वर दिल्या जाणारा लाभ अथवा रेशनकार्ड रद्द करण्यात येईल असे कोणताही निर्णय जि.आर. मध्ये तसेच शासन आदेश व परिपत्रकात म्हटलेला नाही. त्यामुळे दुचाकी आहे म्हणुन रेशनकार्ड रद्द तसेच लाभ मिळणार नाही यात कोणतेही तथ्य नाही. मात्र ज्यांचे उत्पन्न १ लाखाच्यावर असेल तर त्याचे केशरी शिधापत्रिका रद्द करून त्याजागी श्वेत शिधापत्रिका देणे, विदेशी नागरिकांना शिधापत्रिका दिली जाणार नाही, याची दक्षता घेणे, अशा महत्त्वाच्या जबाबदाऱ्या जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात येणाऱ्या समितीवर सोपविण्यात आल्या आहेत.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय