प्लस पोलिओ सारखी लसीकरण सेंटर सुरू करावीत
पिंपरी चिंचवड : शहरात कोरोना रुग्णसंख्या दररोज वाढत आहे. चिंचवड, भोसरी मधील दाट लोकवस्तीत संसर्ग वाढला आहे. शहर परिसरातील 8 सरकारी आणि 11 खाजगी केंद्रावर लसीकरण सुरू करण्यात आले आहे. सध्या1398 रुग्णांवर पालिकेच्या दवाखान्यात उपचार सुरू आहेत. एकूण 26 हजार 602 जणांनी कोरोना लस घेतली आहे.
गेल्या वर्षी सरकारने कठोर निर्बंध घालून कोरोना प्रसार रोखला होता. मनपा आणि पोलीस प्रशासन अजूनही लोकांना जागृत राहण्याच्या सूचना देत आहेत. दररोज रुग्णांचा आकडा 500 पार करून शहराला कोरोनाचा विळखा घालण्याची शक्यता आहे. याबद्दल शहरातील डॉक्टरांच्या विशेष प्रतिक्रिया :
चिखली येथील पवार वस्तीमध्ये सेवा देणारे डॉ. अविनाश वाघमारे सांगतात, पिंपरी चिंचवड शहरातील कोरोना प्रसार वाढण्यास नागरिक जबाबदार आहेत. नागरिक पर्यटन मूढ मध्ये असतात, गांभीर्य नाही. पोलीस कारवाई करतात, म्हणून नागरिक मास्क वापरतात. मुळात सर्जिकल मास्क वापरला पाहिजे. त्यामुळे सर्दी पडशाचे ड्रॉप बाहेर उडत नाहीत. शहरातील कोरोना 2020 सारखा आहे.
तर प्राधिकरण सेक्टर 16 येथील डॉ. सुवर्णा महाजन सांगतात, लग्नसराईमुळे लोक गर्दी करतात, ग्रामीण भागात मास्क बाबत लोक गंभीर नाहीत. शहरात ग्रामीण भागातून येणाऱ्या पाहुण्यांनी काही दिवस विलागीकरण सहन करावे. महानगरपालिकेने पल्स पोलिओ सारखी सेंटर उभारून प्रत्येक वार्डात लसीकरण करावे.