Pune / राजेंद्रकुमार शेळके : चिंचवड पुणे येथील रोटरी क्लब ऑफ डायनॅमिक भोसरी यांच्या वतीने स्तंभलेखक संजय नलावडे यांना नुकतेच ‘शिवनेरीची श्रीमंती’ या त्यांच्या पहिल्या संशोधनात्मक पुस्तकासाठी ‘लिटरेचर एक्सलन्स पुरस्कार – २०२४’ (रोटरी साहित्य सेवा पुरस्कार) रोटरी क्लब पुणे ३१३१ चे प्रांतपाल शितल शहा यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला.
रोटरी क्लब ऑफ डायनॅमिक भोसरी शाखेचे नवनिर्वाचित अध्यक्ष दिपक सोनवणे आणि सेक्रेटरी डॉ. संतोष मोरे यांचा पदग्रहण समारंभ नुकताच पिंपरी चिंचवड येथील सायन्स पार्क ऑडिटोरियम मध्ये संपन्न झाला. (Pune)
याच समारंभात स्तंभलेखक संजय नलावडे यांनी जुन्नर तालुक्यातील काळाच्या पडद्याआड गेलेल्या विविध क्षेत्रातील गुणिजनांची सखोल आणि संशोधनात्मक माहिती ‘शिवनेरीची श्रीमंती’ पुस्तकरूपाने प्रकाशित केल्याबद्दल त्यांना रोटरी साहित्य सेवा पुरस्कार – २०२४’ देऊन सन्मानित करण्यात आले.
सुरूवातीला स्वागत आणि प्रास्ताविक डॉ. अशोक पगारिया यांनी केले तर वर्षभरात झालेल्या सामाजिक कामांची माहिती मावळते अध्यक्ष ज्ञानेश्वर विधाते यांनी दिली. आगामी वर्षातील नियोजित उपक्रमांची माहिती नवनिर्वाचित अध्यक्ष दिपक सोनवणे यांनी दिली तर सेक्रेटरी डॉ. संतोष मोरे यांनी सर्वांचे आभार मानले. सायली सोनवणे यांनी या कार्यक्रमाचे अतिशय सुंदर निवेदन केले.
हेही वाचा :
‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजने’द्वारे ज्येष्ठ नागरिकांची तीर्थक्षेत्र भेटीची इच्छा शासन पूर्ण करणार
सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका अंतर्गत भरती
मोठी बातमी : भारताला मोठा धक्का ; ऑलिम्पिकमध्ये विनेश फोगाट अंतिम फेरीतून अपात्र
साप पकडताना सर्पमित्राला सापाचा दंश, सर्पमित्राचा दुर्दैवी मृत्यू
BSNL लवकरच 5G आणणार, पहिला 5G व्हिडीओ कॉल यशस्वीरित्या
बांगलादेशातील दंगलीत २५ लोकांना जिवंत जाळले, फाईव्ह स्टार हॉटेल पेटवले