Thursday, May 2, 2024
Homeग्रामीणपाटस टोल प्लाझा येथे रस्ते सुरक्षा अभियाना चे उत्साहात आयोजन

पाटस टोल प्लाझा येथे रस्ते सुरक्षा अभियाना चे उत्साहात आयोजन

पाटस /प्रतिनिधी रत्नदीप सरोदे : पुणे सोलापूर एक्सप्रेस वे प्रा .लि. यांचे वतीने 35 व्या राष्ट्रीय रस्ते सुरक्षा अभियानाचे पाटस टोल प्लाजा येथे उत्साहात आयोजन करण्यात आले. यानिमित्त पाटस टोल प्लाजा येथे प्रथमोपचार, सर्पदंश, सी.पी.आर. या संबंधी माहिती देण्यात आली.



या कार्यक्रमासाठी पुणे सोलापूर एक्सप्रेस वे प्रा.ली.चे ऑपरेशन मॅनेजर रवीकुमार मारवाडी, एच. आर. मॅनेजर राजेश सिंग, प्लाझा मॅनेजर अनिल सिन्नुर, लीगल ऑफिसर एडवोकेट योगेश सरोदे, सिस्टीम मॅनेजर समाधान पवार, ऑडिटर अमरजीत सिंग कुशवाह, प्लाझा मॅनेजर नितीन शिंदे ,महामार्ग सुरक्षा बलाचे प्रभारी अधिकारी प्रल्हाद रोटे, सीनियर एक्झिक्यूटिव्ह गुलाब शेख, टोल ऑडिटर आनंद सरोदे, शुभम मिसाळ, नर्सिंग ऑफिसर स्वागत गायकवाड,शिफ्ट इन्चार्ज विकास दिवेकर इत्यादी उपस्थित होते.



या कार्यक्रमांमध्ये नर्सिंग ऑफिसर स्वागत गायकवाड यांनी अपघातावेळी करावयाच्या उपायोजना यामध्ये प्रथमोपचार, सीपीआर, सर्पदंशावेळी घ्यावयाची काळजी, विजेचा झटका लागल्यानंतर त्या व्यक्तीला द्यावयाचे उपचार याबाबत विस्तृतपणे सांगितले तसेच प्रथमोपचार व सी. पी .आर. याबाबतची अधिकची माहिती ऑपरेशन मॅनेजर रवी कुमार मारवाडी व प्लाझा मॅनेजर अनिल सिन्नुर यांनी दिली . तसेच अपघात ग्रस्त व्यक्तींचा जीव वाचवण्यासाठी आणीबाणीच्या वेळी आवश्यक रक्ता बाबत रक्तदान करणे किती आवश्यक आहे याची माहिती दिली. या कार्यक्रमासाठी पुणे सोलापूर एक्सप्रेस वे चे अधिकारी, स्टाफ, अपेक्षा एंटरप्राइजेस तसेच मार्कोलाइन चे कर्मचारी ,महाराष्ट्र सुरक्षा बलाचे कर्मचारी इत्यादी उपस्थित होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय