Thursday, May 2, 2024
HomeNewsPCMC:पत्रकार निखिल वागळे  हल्ल्याच्या निषेधार्थ इंडिया आघाडीचे पिंपरीत आंदोलन

PCMC:पत्रकार निखिल वागळे  हल्ल्याच्या निषेधार्थ इंडिया आघाडीचे पिंपरीत आंदोलन

पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर:पुण्यामध्ये ‘निर्भय बनो’ कार्यक्रमासाठी पोहोचलेल्या पत्रकार निखिल वागळे यांच्या गाडीवर पोलिस बंदोबंदात जात असताना ही प्राणघातक हल्ला करण्यात आला.

भाजपकडून कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा दिल्यानंतर निखिल वागळे यांना निर्भय बनो कार्यक्रमासाठी पोहोचण्यासाठी पोलिस बंदोबस्त देण्यात आला.मात्र, कार्यक्रमस्थळी पोहोचेपर्यंत पोलिस बंदोबस्त असतानाही चारवेळा गाडी फोडण्यात आली. इतकंच नव्हे, तर शाईफेक तसेच अंडीफेक करण्यात आली.

या घटनेचा  इंडिया आघाडी गटबंधन यांच्या वतीने पिंपरी येथे जाहीर निषेध करण्यात आला.
यावेळी आम आदमी पार्टीचे शहराध्यक्ष मिना जावळे,प्रवक्ते प्रकाश हगवणे,आप उपाध्यक्ष अशोक लांडगे,शिवसेना उद्धव गट जिल्हाध्यक्ष माजी आमदार गौतम चाबुकस्वार,राष्ट्रवादी शरद पवार गट,तुषार कामठे,देवेंद्र तायडे, काँग्रेस अध्यक्ष कैलास कदम,मानव कांबळे,मारुती भापकर,सतीश काळे यांनी तीव्र शब्दांमध्ये निषेध करत सरकारचे वाभाडे काढले.

 यावेळी आम आदमी पार्टीचे पदवीधर प्रदेशाध्यक्ष चेतन बेंद्रे,आप उपाध्यक्ष संतोष इंगळे,सचिन पवार, वैजनाथ शिरसाठ,ब्रह्मानंद जाधव,स्मिता पवार, सरोज कदम,कमलेश रनवरे सुरेश बावनकर,अजय सिंग,सुरेश भिसे आदी  विविध पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय