Sunday, May 12, 2024
Homeग्रामीणनिघोजे शाळेत क्रांतिकारकांची जयंती साजरी

निघोजे शाळेत क्रांतिकारकांची जयंती साजरी

क्रांतिकारकांच्या प्रतिमा शाळेस भेट

आळंदी/अर्जुन मेदनकर : निघोजे ( ता, खेड ) पुणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे आणि क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांचे प्रतिमा पुजन करून पुष्पहार अर्पण करीत पुष्पांजली अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी क्रांतिकारकांच्या प्रतिमा शाळेस भेट देण्यात आल्या.
पुणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निघोजे येथे विनम्र अभिवादन सामाजिक उपक्रमाचे प्रसंगी निघोजे प्राथमिक शाळेत अभिवादन सभा घेण्यात आली. यावेळी नमामि इंद्रायणी प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर, पत्रकार सोमनाथ बेंडाले, संत ज्ञानेश्वर महाराज माऊलींचे सेवेकरी ज्ञानेश्वर कुऱ्हाडे पाटील, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सोमनाथ येळवंडे, उपाध्यक्ष मंदाकिनी येळवंडे, पल्लवी येळवंडे, राणी येळवंडे, पुजा कान्हुरकर, शाळेचे मुख्याध्यापक संदीप काळे, शिक्षक, शिक्षिका, शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी मुख्याध्यापक संदीप काळे यांनी शालेय मुलांना मार्गदर्शन करीत क्रांतिकारकांच्या जीवन चरित्रावर आधारित प्रबोधन केले. थोर समाज सुधारक, क्रांतिकारक, राष्ट्रपुरुष यांचे कार्यातून प्रेरणा घेऊन कार्यरत राहण्याचे आवाहन काळे यांनी केले.शालेय जीवनात संस्कार रुजविल्यास येत्या भारतीय पिढ्या संस्कारक्षम आणि सुसंस्कृत होतील.भारतीय समाज यातून निश्चित सक्षम घडेल असे अर्जुन मेदनकर यांनी सांगितले. संयोजन मुख्याध्यापक संदीप काळे, सोमनाथ बेंडाले यांनी केले. यावेळी हुतात्मा राजगुरू पत्रकार संघाचे वतीने बाबासाहेब भंडारे यांचे तर्फे क्रांतिकारकांच्या प्रतिमा निघोजे शाळेस भेट देऊन विनम्र अभिवादन करण्यात आले.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय