Sunday, July 14, 2024
HomeNewsनिर्बंधमुक्त भारत ! 31 मार्च नंतर कोणताही नवा आदेश नाही केंद्राचे सर्व...

निर्बंधमुक्त भारत ! 31 मार्च नंतर कोणताही नवा आदेश नाही केंद्राचे सर्व राज्यांना पत्र !

नवी दिल्ली : कोरोना महामारीला दोन वर्षे तोंड देत निर्बंधांना सहन केलेल्या नागरिकांना आता ३१ मार्चपासून निर्बंधमुक्त वातावरण लाभणार आहे. केंद्र सरकारने संपूर्ण देशातून कोरोनाशी संबंधित निर्बंध मागे घेण्याचा निर्णय घेतला असला तरी मास्क आणि सामाजिक अंतर राखणे अनिवार्य असेल.

केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना पाठवलेल्या पत्रात केंद्राच्या या निर्णयाची माहिती दिली.

केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात कामगारांचा 28 आणि 29 मार्च रोजी देशव्यापी संप !

पत्रात म्हटले की, मार्च २०२० मध्ये केंद्र सरकारने पहिल्यांदा आपत्तीव्यवस्थापन अधिनियम, २००५ अंतर्गत कोरोना रोखण्यासाठी दिशा-निर्देश जारी केले होते. कोरोनाच्या साथीने जसजसे स्वरूप धारण केले त्याप्रमाणे निर्बंधांमध्ये बदलही केले.

गोवा शिपयार्ड लिमिटेड मध्ये विविध पदांच्या एकूण २६४ जागामहाराष्ट्र विधान परिषदेतून हे दहा सदस्य निवृत्त !

गेल्या २४ महिन्यांत कोरोनाला रोखण्यासाठी वेगवेगळे उपाय करण्यात आले. त्यात कोरोना स्क्रीनिंग, मॉनिटरिंग, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, उपचार, लसीकरण, रुग्णालयात दाखल करणे आणि सामान्य जनतेत जागरुकता आदींचा समावेश होता.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय