Saturday, May 18, 2024
Homeआरोग्यअडिवरे केंद्रावर लसीकरणाला प्रतिसाद

अडिवरे केंद्रावर लसीकरणाला प्रतिसाद


अडिवरे (ता . २३ ) :
अडिवरे ( ता . आंबेगाव ) प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत असलेल्या फुलवडे , बोरघर , माळीण , अडिवरे , असाणे , आहुपे , पिंपरगणे या उपकेंद्रांवर १८ वर्षांपुढील नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यात येत असून , मंगळवारी एकूण ५५१ नागरिकांना लस देण्यात आली असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ . शिवांजली करांडे यांनी दिली . यामध्ये १८ ते ४४ वयोगटातील ३४५ जणांना पहिला , ११ जणांना दुसरा , ४५ ते ५ ९ वयोगटातील ७ जणांना पहिला , ९ ८ जणांना दुसरा , ६० वर्षापुढील १४ जणांना पहिला , ७६ जणांना दुसरा असे एकूण ३६६ जणांना पहिला व १८५ जणांना दुसरा डोस देण्याच येऊन एकूण ५५१ जणांचे लसीकरण करण्यात आले .

लसीकरणासाठी डॉ . चंद्रकांत चपटे , डॉ . दत्तात्रेय धोत्रे , डॉ शिवांजली करांडे , डॉ . गणेश चिमटे डॉ . भाग्यश्री इंगळे , डॉ . वैशाली बावले , आरोग्यसेविका अलका मुंढे नम्रता शिंदे , सविता किर्वे अंकिता शिंदे , पुष्पा भंडलकर , सीमा उघडे, मंगल चव्हाण , अमोल जाधव , सुपरवायझर गोविंद भारमळ , मोहन विरणक व आशासेविका कार्यरत आहेत . तसेच फुलवडे येथील आरोग्य उपकेंद्रात सरपंच मनीषा नंदकर व ग्रामसेविका आशा मुंढे यांच्या उपस्थितीत लसीकरण पार पडले .

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय