Thursday, November 21, 2024
Homeजुन्नरJunnar : कॅनरा बँक आपटाळे यांच्या वतीने उच्छिल येथील सर्व शिक्षकांचा सन्मान

Junnar : कॅनरा बँक आपटाळे यांच्या वतीने उच्छिल येथील सर्व शिक्षकांचा सन्मान

Junnar, (आनंद कांबळे) : कॅनरा बॅक आपटाळे यांच्या वतीने आज उच्छिल शाळेची निवड करून शिक्षकदिनानिमित्त सन्मान करताना बॅकेचे मॅनेजर विशाल यादव व ऑफिसर हितेश मानकर सर्व शिक्षकवृंद यांचा सन्मान करण्यात आला.

कॅनरा बँक यांच्या वतीने शाळेतील आदिवासी गुणवत्ताधारक मुलींना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॅनरा विद्या ज्योती योजनेचा लाभ प्रति विद्यार्थी 3000 प्रमाणे दोन वर्ष देण्यात आला आहे. सर्व विद्यार्थ्यांचे खाते शून्य बॅलन्सने काढण्यात आले असून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उच्छील या शाळेतील शंभर टक्के खाती ही राष्ट्रीयकृत कॅनरा बँक यांची असून विद्यार्थ्यांना व पालकांना आणि शिक्षकांना अनमोल सहकार्य बँकेच्या माध्यमातून सातत्याने करण्यात येत आहे. (Junnar)

त्याचप्रमाणे सहशालेय उपक्रमांतर्गत बँक आपल्या बँकेने देखील सर्व विद्यार्थ्यांना व शिक्षकांना स्वतः शाळेत येऊन विद्यार्थ्यांना बँक विषयी मार्गदर्शन स्वतः शाळेत केले. तसेच बँकेत देखील सर्व शिक्षकांना बँकेच्या कामकाजाविषयी माहिती व सहकार्य केले. याचाच उपयोग आम्हाला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमांतर्गत बँकेचा आम्हाला नक्कीच उपयोग झाला.

आज देखील शिक्षक दिनाचे औचित्य साधून शाळेत येऊन बँकेने शाळेचे मुख्याध्यापक अन्वर सय्यद, पदवीधर शिक्षक सुभाष मोहरे, ज्येष्ठ शिक्षिका स्मिता ढोबळे सहशिक्षिका आरती मोहरे व लीलावती नांगरे यांचा सन्मान करून शाळेचे शैक्षणिक कार्य पाहून शाळेचा व शिक्षकांचा गुणगौरव उद्गार काढून आज शिक्षक दिनाचे औचित्य साधून सर्व इयत्ता सातवी व सहावी या दोन वर्गातील विद्यार्थ्यांनी आज सकाळ सत्रा पासून सर्व शालेय कामकाज पाहिले अध्यापनाचे कामकाज देखील अतिशय सुरेख असे केले. (Junnar)

सर्व विद्यार्थ्यांनी देखील शिक्षकांचे कौतुक देखील केले त्याचबरोबर शिक्षक दिनाच्या निमित्ताने शालेय समितीचे अध्यक्ष सचिन नवले यांनी देखील सर्व शिक्षकांना व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना खाऊ दिला व शिक्षणा फाउंडेशनचे समन्वयक पोपट पोटे याने देखील त्यांच्या शिक्षणा फाउंडेशनच्या वतीने शाळेतील सर्व शिक्षकांचा सन्मान केला.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने शिक्षक पालक संघाचे सदस्य शिवाजी नवले उपस्थित होते. या सर्वांनी शालेय पुढील कामकाजासाठी शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष मोहरे यांनी तर आभार सौ स्मिता ढोबळे यांनी मांडले.

junnar

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

मोठी बातमी : कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना टोल माफी

मोठी बातमी : ‘आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरेंचे’ नाव राज्यातील ‘या’ मोठ्या धरणाला

मी महाराष्ट्रातील 13 कोटी जनतेची माफी मागतो – अजित पवार

मोठी बातमी : ‘म्हाडा’च्या ३७० सदनिकांच्या विक्री किंमतीत १० ते २५ टक्क्यांपर्यंत कपात

शिवरायांचा पुतळा कोसळण्याची कारणे शोधण्यासाठी नौदल-राज्य शासनाची संयुक्त तांत्रिक समिती

मोठी बातमी : राजकोट किल्ल्यावर मोठा राडा, शिवरायांच्या पुतळ्या राजकारण तापले

“घरात खेचून एकेकाला रात्रभर मारून टाकेन” नारायण राणे यांची जीवे मारण्याची धमकी

संबंधित लेख

लोकप्रिय