Friday, November 22, 2024
Homeआरोग्यआरोग्य विषयक काम करणारे व्यक्तींचा सन्मान - किसान सभेचा पुढाकार

आरोग्य विषयक काम करणारे व्यक्तींचा सन्मान – किसान सभेचा पुढाकार

घोडेगाव : जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधत आरोग्य विषयक काम करणारे व्यक्तींचा सन्मान अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने करण्यात आला. यावेळी ग्रामीण रुग्णालय घोडेगाव व पंचायत समिती, मधील आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांना, गुलाबपुष्प, पेन व पुस्तक देऊन सन्मानित केले.

जागतिक आरोग्य दिन, संपूर्ण जगभर साजरा केला जातो. यावर्षी मुख्यतः आपली पृथ्वी, आपले आरोग्य या ब्रीदला समोर ठेवून अनेक उपक्रम जगभर राबविले गेले. वाढत्या तापमान वाढीमुळे व प्रदुषित  हवेमुळे मानवाचे तसेच पृथ्वीचे आरोग्य धोक्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधत, किसान सभा, आंबेगाव तालुका समितीन चांगल्या आरोग्यासाठी चांगले पर्यावरण किती गरजेचे आहे, याविषयी, विशेष जाणीवजागृती कार्यक्रम आयोजित करण्याचा संकल्प केला आहे.

जुन्नर : घाटघर शाळेला पर्यावरण संवर्धन असोसिएशन च्या वतीने सौर वीज युनिट व लॅपटॉप संच

विशेष : पृथ्वीच्या आणि भावी पिढ्यांच्या भवितव्यासाठी कृतीची गरज, हवामान बदलामुळे मानवी जीवन धोक्यात !

कोविड काळात, सार्वजनिक व खाजगी क्षेत्रातील आरोग्य विभागातील सर्वच व्यक्तींनी केलेले काम हे खुप प्रेरणादायी व जीवनदायी होते. यावेळी ग्रामीण रुग्णालय, घोडेगाव चे वैद्यकीय अधिकारी डॉ.राहुल जोशी व त्यांचे सर्व सहकारी तसेच पंचायत समिती,आरोग्य विभागातील श्री. जाधव, श्री.लवांडे व त्यांचे सहकारी यांचे स्वागत करण्यात आले.

यावेळी किसान सभेचे उपाध्यक्ष राजू घोडे, कमलताई बांबळे, नंदन लोंढे, दिव्या जाधव यांनी संबंधितांचे स्वागत करून, आरोग्य विभागात कार्यरत असणाऱ्या सर्वांचे ऋण व्यक्त केले.


संबंधित लेख

लोकप्रिय