Wednesday, February 28, 2024
Homeजुन्नरनुकसान भरपाईसह विविध मागण्यांचे किसान सभेच्या वतीने तहसीलदारांना निवेदन

नुकसान भरपाईसह विविध मागण्यांचे किसान सभेच्या वतीने तहसीलदारांना निवेदन

जुन्नर : जुन्नर तालुक्यामध्येही शेतकऱ्यांचे अवकाळी पावसाने मोठे नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे करून योग्य भरपाई द्या, या व अन्य मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभेच्या जुन्नर तालुका समितीच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

यावेळी दुधाचे भाव अत्यंत कमी झालेले आहेत. राज्य शासनाने 34 रुपये हा हमीदर जाहीर करून ही, दूध उत्पादक शेतकऱ्याला मात्र आज 26 ते 27 रुपये दर मिळत आहे. त्यामुळे राज्यशासनाने त्वरित हस्तक्षेप करून दूधसंघ व खाजगी कंपन्यांना किमान 34 रुपये दर देणे जे अगोदरच बंधनकारक केले आहे. त्या निर्णयाची सक्तपणाने अंमलबजावणी करण्यासाठी ठोस निर्णय घ्यावे, दुधाला राज्यशासनाने जो हमीभाव घोषित केलेला आहे तो मिळावा यासाठी मागील सहा दिवसांपासून राज्यभरामध्ये विविध ठिकाणी दूध उत्पादक शेतकरी उपोषणाला बसलेले आहेत. या उपोषणाला आम्ही पाठिंबा देत आहोत, असेही किसान सभेचे लक्ष्मण जोशी म्हणाले.

मागील दोन दिवसांपासून किसान सभेचे राज्याचे नेते डॉ. अजित नवले हे ही उपोषणाला बसलेले आहेत. राज्य शासनाने याची अत्यंत गंभीरपणे दखल घेऊन उपोषणकर्ते यांच्याशी संवाद साधून दुधाला जाहीर केलेला हमीभाव कसा मिळेल यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावेत. या उपोषणाची गंभीर दखल न घेतल्यास किसान सभेचे तीव्र आंदोलन या पुढील काळात सुरू राहील, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

यावेळी सर्व योजना कर्मचाऱ्यांना किमान २६,००० हजार रूपये वेतन चालू करा, शासकीय दर्जा द्या, जुन्नर तालुक्यात रोजगार हमी योजनेची कामे चालू करा, जुन्नर तालुक्यातील विविध गावांना जाणारे रस्ते अत्यंत खराब आहे, त्याची दुरुस्ती १५ दिवसात करावी, तालुक्याच्या पश्चिम भागात १०८ रुग्णवाहिका ताबडतोब सुरू करावी. या मागण्या यावेळी करण्यात आल्या.

यावेळी किसान सभेचे तालुका सचिव सचिव लक्ष्मण जोशी, कार्याध्यक्ष कोंडीभाऊ बांबळे, अंगणवाडी संघटना अध्यक्षा शुभांगी शेटे, सचिव मनीषा भोर, दूध उत्पादक शेतकरी सागर लांडे, सुप्रिया खरात, छाया डोके, सुनीता कुलवडे, छाया भोर, सीमा कुटे, वंदना डोके, रुपाली जोशी उपस्थित होते.

Mahaegs Maharashtra Recruitment
संबंधित लेख

 


- Advertisment -

लोकप्रिय