मुंबई : तबल्याच्या जादुई थापांनी जगभरातील रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे प्रख्यात तबला वादक उस्ताद झाकीर हुसैन (Zakir Hussain) यांचे 73व्या वर्षी निधन झाले. अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या दोन आठवड्यांपासून ते रुग्णालयात दाखल होते. फुफ्फुसांशी संबंधित ‘इडिओपॅथिक पल्मोनरी फायब्रोसिस’ या आजारामुळे त्यांची प्रकृती खालावत गेली आणि सोमवारी त्यांनी जगाचा निरोप घेतला.
उस्ताद झाकीर हुसैन यांचा जन्म 9 मार्च 1951 रोजी झाला. त्यांचे वडील उस्ताद अल्लारखा हे स्वतः एक महान तबला वादक होते आणि झाकीर यांनी वडिलांकडूनच तबल्याचे शिक्षण घेतले. 11व्या वर्षी त्यांनी अमेरिकेत पहिला कॉन्सर्ट केला आणि तबल्याला जागतिक ओळख मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला.
Zakir Hussain यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित
उस्ताद झाकीर हुसैन यांना तबल्याच्या कलेसाठी तीन ग्रॅमी पुरस्कारांसह अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरवण्यात आले. भारत सरकारने त्यांना पद्मभूषण आणि पद्मविभूषण पुरस्कार देऊन सन्मानित केले. तबल्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळवून देण्यामध्ये त्यांचे योगदान अमूल्य आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी अँटोनिया मिनेकोला आणि दोन मुली अनीशा कुरेशी व इसाबेला कुरेशी असा परिवार आहे. झाकीर हुसैन यांच्या निधनाने संगीतविश्वाला मोठा धक्का बसला असून अनेक प्रसिद्ध व्यक्तींनी सोशल मीडियावर त्यांच्या जाण्याबद्दल दुःख व्यक्त केले आहे.
झाकीर हुसैन यांनी संगीताच्या क्षेत्रात एक अनमोल ठेवा निर्माण केला. तबल्याच्या माध्यमातून त्यांनी संगीतविश्वाला समृद्ध केले आणि संगीतप्रेमींना नेहमीच प्रेरणा दिली.
हे ही वाचा :
मोठी बातमी : आज महायुती सरकारच्या नवीन मंत्र्यांचा शपथविधी सोहळा, पहा संभाव्य मंत्र्यांची यादी
धक्कादायक : शस्त्रक्रियेनंतर 43 महिलांना झोपवले जमिनीवर, नागरिकांचा संताप
ब्रेकिंग : जळगाव येथे बस-ट्रॅक्टरचा भीषण अपघात; एक ठार, २१ जखमी
ब्रेकिंग : …म्हणून अल्लू अर्जुनला जेलमध्ये काढावी लागली रात्र
खुशखबर : लाडकी बहीण योजनेचा हप्ता ‘या’ दिवशी मिळणार, महत्वाची माहिती समोर
लोकसभेत प्रियांका गांधी यांची मोदी सरकार जोरदार टीका, राजा वेश बदलतो…
काश्मीर मध्ये मायनस तापमान, उत्तर भारतासह महाराष्ट्रात थंडीची लाट कायम
मोठी बातमी : साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनला अटक, वाचा काय आहे प्रकरण !