कबनूर / क्रांतीकुमार कडुलकर – साथी के एम आवळे स्मृतिदिनानिमित्त मातंग समाज मंदिरच्या प्रांगणात सत्यशोधक फाऊंडेशन आणि राष्ट्र सेवा दल,कबनूर वतीने साने गुरुजी 125 अभियान अंतर्गत विभागीय मेळावा उत्साहात संपन्न झाला. (Kolhapur)
यामध्ये स्वागत आणि प्रास्ताविक कार्याध्यक्ष नौशाद शेडबाळे यांनी केले. राष्ट्र सेवा दल मिरज आणि इचलकरंजीच्या कलापथकांनी परिवर्तनाची गाणी सादर केली. साने गुरुजी आणि साथी के एम आवळे यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात झाली.
प्रमोद आवळे यांनी स्मृति सप्ताहात झालेल्या कार्यक्रमांचा अहवाल सादर केला. विनायक सपाटे यांनी पाहुण्यांची ओळख करुन दिली. सर्व मान्यवरांना संविधान, शाल, गांधी टोपी देवून सन्मानित करण्यात आले.
संविधान राजवैभव शोभा रामचंद्र यांनी संविधानावरील हल्ले आपण हातात दांडकं घेवून निषेध करणार असलो, हिंसा करणार असलो तर चळवळीची फसगत होण्याची शक्यता आहे, संयमाने आणि विवेकाने वाटचाल करूया. आक्रमक प्रबोधन करुया! असे विचार व्यक्त केले. (Kolhapur)
संत साहित्याचे अभ्यासक हभप ज्ञानेश्वर बंडगर महाराजांनी संत विचारांचा परिवर्तन प्रक्रियेवर झालेला परिणाम विविध दाखले आणि उदाहरणे देवून पटवून दिला तसेच साने गुरुजी आधुनिक काळातील संतच होते हे सोदाहरण स्पष्ट केले.
संविधान संवादक समिती महाराष्ट्रचे राज्य कार्याध्यक्ष सुनिल स्वामी यांनी साने गुरुजींच्या साहित्यातील संविधानिक मुल्यांवर उहापोह केला तसेच तरुण संवादक कार्यकर्ते यांनी केलेल्या कार्याचा गौरव केला.
अध्यक्षीय समारोप करताना डाॅ बाबुराव गुरव म्हणाले,” परिस्थिती बिकट असताना हातपाय न गाळता, निराश न होता मोर्चेबांधणी आणि अभ्यासाकडे लक्ष द्यायचे असते. पुन्हा राष्ट्र सेवादला सारख्या संघटनांना ऊर्जितावस्था आणण्याचा हा काळ आहे. लहानग्या मुलांच्या मनाला जात-धर्मवादी विषारी संस्काराची लागण होण्यापासून वाचवावे लागेल.”
यावेळी सेवादल सदस्यता अभियानासाठीची पुस्तके सदाशिव मगदूम यांनी सुपूर्द केली. या वेळी डाॅ प्रदीप आवळे, प्रल्हाद माने, मारुती आवळे, जगन्नाथ कांदळकर, राजन मुठाणे, बजरंग लोणारी,अनिल होगाडे, लता माने, सुनिल पोवार, नवीन आवळे, शहनाज मोमीन, इकबाल देसाई, वैभवी आढाव, स्नेहल माळी, शरद वास्कर, विनया चनगुंडी, रोहित शिंदे, किरण कांबळे, शाहिस्ता मुल्ला, पद्माकर तेलसिंगे, जयप्रकाश जाधव, गणपती शिंदे आदि कार्यकर्ते व नागरिक आवर्जून उपस्थित होते.
याच्या यशस्वीतेसाठी प्रा रवींद्र पाटील, रुचिता पाटील, दामोदर कोळी, प्रभाकर आवळे, अमोल पाटील, अशोक वरुटे, रोहित दळवी, उषा कोष्टी यांनी प्रयत्न केले.
सूत्रसंचालन संजय रेंदाळकर यांनी केले तर आभार इंद्रायणी पाटील यांनी मानले.