हैदराबाद : तेलुगू सुपरस्टार अल्लू अर्जुनची (Allu Arjun) चंचलगुडा कारागृहातून शनिवारी सकाळी जामिनावर सुटका करण्यात आली. तेलंगाणा उच्च न्यायालयाने त्याला चार आठवड्यांसाठी 50,000 रुपयांच्या हमीवर अंतरिम जामीन मंजूर केला.
अल्लू अर्जुनला (Allu Arjun) 4 डिसेंबर रोजी ‘पुष्पा 2: द रूल’ या चित्रपटाच्या प्रीमिअर शोदरम्यान हैदराबादमधील संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत 39 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याच्या घटनेप्रकरणी अटक करण्यात आली होती. हैदराबाद पोलिसांनी त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला.
नांपल्ली न्यायालयाने अल्लू अर्जुनला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर त्याला चंचलगुडा कारागृहात पाठवण्यात आले होते. शुक्रवारी तेलंगाणा उच्च न्यायालयाने त्याला अंतरिम जामीन मंजूर केला. मात्र, जामिनाचे आदेश रात्री उशिरा मिळाल्याने सुटका होऊ शकली नाही, आणि अल्लू अर्जुनला रात्री कारागृहातच राहावे लागले. शनिवारी सकाळी जामिनाचे कागदपत्रे सादर झाल्यानंतर त्याची सुटका करण्यात आली.
अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि थिएटर मालकांवर प्रीमिअर शो दरम्यान गर्दी नियंत्रणासाठी आवश्यक खबरदारी न घेतल्याचा आणि निष्काळजीपणाचा आरोप आहे. या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाल्याने पोलिसांनी गंभीर गुन्हे दाखल केले आहेत.
अटक झाल्यानंतर अल्लू अर्जुनला चिक्कडपल्ली पोलिस ठाण्यात नेण्यात आले होते. त्यावेळी त्याचे वडील अल्लू अरविंद, निर्माता दिल राजू आणि कुटुंबीयांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली होती.
(Allu Arjun)
हे ही वाचा :
ब्रेकिंग : जळगाव येथे बस-ट्रॅक्टरचा भीषण अपघात; एक ठार, २१ जखमी
ब्रेकिंग : …म्हणून अल्लू अर्जुनला जेलमध्ये काढावी लागली रात्र
खुशखबर : लाडकी बहीण योजनेचा हप्ता ‘या’ दिवशी मिळणार, महत्वाची माहिती समोर
लोकसभेत प्रियांका गांधी यांची मोदी सरकार जोरदार टीका, राजा वेश बदलतो…
काश्मीर मध्ये मायनस तापमान, उत्तर भारतासह महाराष्ट्रात थंडीची लाट कायम
मोठी बातमी : साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनला अटक, वाचा काय आहे प्रकरण !
मोठी बातमी : सर्वात कमी वयात डी. गुकेश ने वर्ल्ड चेस चॅम्पियनशिप जिंकत रचला इतिहास
Fire : तामिळनाडूत हॉस्पिटलला लागलेल्या आगीत 7 ठार
महाराष्ट्र राज्य लॉटरी नोव्हेंबर २०२४ चा भव्य सोडतीचा निकाल जाहीर
धक्कादायक : पत्नीच्या छळाला कंटाळून इंजिनियरची आत्महत्या, तब्बल 24 पानांची लिहली सुसाईड नोट