Saturday, May 4, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडपिंपळेगुरव येथे भर चौकातच रस्त्यावर टाकली लाल माती, अपघाताचा धोका

पिंपळेगुरव येथे भर चौकातच रस्त्यावर टाकली लाल माती, अपघाताचा धोका

पिंपरी चिंचवड : शहरात सगळीकडे विकास कामे चालू आहेत तर काही ठिकाणी अर्धवट हि कामे राहिलेली आहेत. संततधार पावसामुळे नागरिक हैराण झाले, त्यातच पिंपळे गुरव येथील कांकरिया गॅस गोडाऊनच्या चौकात एका ठिकाणी डक्ट मध्ये टाकण्यासाठी लाल माती आणली आहे. येत्या पंधरा दिवसापासून ती तशीच पडून आहे. सततच्या पडणाऱ्या पावसामुळे आता ती माती चिखल युक्त झाल्यामुळे चौकात वळण घेताना दुचाकी स्वार व नागरी पाय घसरून पडण्याचा धोका निर्माण झाला आहे.

पावसात विकासकामे करताना प्रशासनाने नागरिकांची सुरक्षितता अबाधित ठेवली पाहिजे, असे सामाजिक कार्यकर्ते अण्णा जोगदंड व रवी भेंनकी यांनी म्हटले आहे.

– क्रांतिकुमार कडुलकर

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय