Wednesday, May 8, 2024
Homeजिल्हापुणे जिल्हा सहकारी बॅंकेत "इतक्या" पदांसाठी होणार भरती - अजित पवारांचे सूचक...

पुणे जिल्हा सहकारी बॅंकेत “इतक्या” पदांसाठी होणार भरती – अजित पवारांचे सूचक वक्तव्य

पुणे : शेतकरी केंद्रबिंदू मानून सहकारी बँकांचं कामकाज व्हावं तसंच बँकेनं शेतकऱ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असं प्रतिपादन पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, कोऱ्हाळे बु. स्थलांतरित शाखेच्या उद्घाटनाप्रसंगी केलं. 

तसेच पुणे जिल्हा सहकारी बॅंकेनं रिक्त पदं भरण्याबाबत कार्यवाही करावी. या भरतीमध्ये जिल्ह्यातील गरजू मुला-मुलींना गुणवत्तेनुसार संधी मिळणं आवश्यक आहे, असेही उपमुख्यमंत्री पवार म्हणाले ‌‌. पुणे जिल्हा सहकारी बॅंकेत 800 पदे रिक्त असून आता लवकरच भरती होण्याची शक्यता आहे.

नोकरीच्या शोधात आहात ? “या” 36 सरकारी, निमसरकारी विभागात नोकरीची सुवर्णसंधी ! वाचा एका क्लिकवर

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, नागपूर अंतर्गत 1044 जागांसाठी भरती, 10 वी / 12 वी / ITI विद्यार्थ्यांना संधी !

पवार पुढे म्हणाले, पुणे जिल्हा सहकारी बँक शेतकऱ्यांच्या मुलांना परदेशात शिक्षण घेण्यासाठी २५ लाखापर्यंतचं कर्ज देत आहे. नाबार्डची परवानगी घेऊन कर्जाची मर्यादा वाढवण्यासाठी प्रयत्न केले जातील. कोऱ्हाळे बु. शाखा साडे तीन कोटी रुपये नफ्यामध्ये आहे, ही समाधानाची बाब आहे. बॅंकेतील सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी पारदर्शक काम करून ग्राहकांना चांगल्या सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. बँकेत लॉकरच्या सुविधेसोबत सुरक्षिततेची काळजी घेतली गेली पाहिजे. 

फक्त ऊस लागवड करण्याऐवजी पाण्याची उपलब्धता पाहूनच पिकं घ्यावीत. बारामती तालुक्यातील सोमेश्वर, माळेगाव व छत्रपती सहकारी साखर कारखान्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्राजवळ असणारी सर्व गावं त्यांच्या हद्दीत जोडावीत. यावर्षी मराठवाड्यात खूप प्रमाणात ऊस गाळपाविना शिल्लक आहे. शासनानं १ मेपासून गाळप होणाऱ्या ऊसाला टना मागे २०० रुपये अनुदान देण्याचं घोषित केलं आहे. पुढील वर्षापासून साखर कारखाने लवकर सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येईल, असेही ते म्हणाले.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत थेट मुलाखतीद्वारे भरती, ‘या’ तारखेला मुलाखत

राज्यात ६६ हजार जणांना रोजगार मिळणार, कसे ते पहा !

पशुसंवर्धन विभागातील तब्बल ‘इतकी’ रिक्त पदे भरणार

कोचीन शिपयार्ड लिमिटेड मध्ये 261 पदांसाठी भरती, असा करू शकता अर्ज !


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय